Deepak Tijori : बॉलिवूडमधील कलाकारांचे केवळ व्यावसायिक आयुष्यच नव्हे, तर त्यांचे खासगी आयुष्यदेखील नेहमी चर्चेत असते. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडतं असल्याचंही पाहायला मिळालंय. मात्र, 90च्या दशकातील एका अभिनेत्याच्या आयुष्यातील एक सत्य समोर आलं ते खूपच विचित्र होतं. आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या या अभिनेत्याने काही वर्षांपूर्वी एक धक्कादायक खुलासा केला होता. जिच्यासोबत तो गेली 20 वर्षं पती म्हणून राहत होता, ती प्रत्यक्षात त्याची अधिकृत पत्नीच नव्हती. अनेक सुपरस्टार्ससोबत काम करणाऱ्या या अभिनेत्याच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा त्याला कळले की जिच्यावर त्याने विश्वास ठेवला, ती स्त्री प्रत्यक्षात दुसऱ्याच कुणाची पत्नी होती.
‘हीरो’चा मित्र किंवा भावाची भूमिका गाजवणारा अभिनेता
आपण बोलत आहोत 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी (Deepak Tijori) याच्याबद्दल. दीपक तिजोरीने (Deepak Tijori) अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये कधी ‘हीरो’चा भाऊ, तर कधी मित्राची भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली. त्यांनी 1988 मध्ये 'तेरा नाम मेरा नाम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, खरी ओळख मिळाली ती महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून, ज्यामध्ये त्यांनी मुख्य नायक राहुल रॉयचा मित्र साकारला होता. दीपक यांनी हिंदीसोबत गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘दिल है कि मानता नहीं’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अंजाम’, आणि ‘खिलाडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत.
साईड रोल केल्यानंतर सिनेमाचं दिग्दर्शनही केलं
अनेक चित्रपटांमध्ये साईड भूमिकांनंतर दीपक तिजोरी (Deepak Tijori) हळूहळू अभिनयापासून दूर झाला. त्याने ‘ऊप्स’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. मात्र, दीपक तिजोरी चर्चेत आले ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. त्यांनी त्यांच्या पत्नी शिवानीपासून घटस्फोट घेतला होता. पण हा घटस्फोट नेहमीसारखा नव्हता. कारण, दीपक (Deepak Tijori) यांनी स्वतःच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक गूढ सत्य उघड केलं होतं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे प्रकरण त्यांच्या पत्नी शिवानी तोमर यांच्याशी संबंधित होतं.
शिवानी तोमरशी केलेलं लग्न
दीपक तिजोरी (Deepak Tijori) यांने फॅशन डिझायनर शिवानी तोमर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना समारा ही एक मुलगीही आहे. मात्र, दीपक आणि शिवानी यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत नव्हतं. अनेक वर्षांनी दीपकला शिवानीबद्दल एक असं सत्य समजलं, ज्यामुळे त्यांचे डोळेच उघडले. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये अशी बातमी आली की शिवानीने दीपकला घराबाहेर काढलं आहे. तिचा आरोप होता की दीपकचं दुसऱ्या महिलांशी संबंध आहेत. दीपकनेही काउंसलरच्या मदतीने शिवानीविरोधात कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं. तेव्हाच त्यांना धक्कादायक सत्य समजलं. शिवानी कायदेशीर दृष्ट्या त्यांची पत्नीच नव्हती.
20 वर्षांनी उलगडलं सत्य
या प्रक्रियेत दीपकला (Deepak Tijori) कळलं की शिवानीने अजून तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलाच नव्हता. म्हणजेच दीपक जिच्याबरोबर 20 वर्षांहून अधिक काळ राहत होते, ती स्त्री कायदेशीररित्या अजून तिच्या पहिल्या नवऱ्याची पत्नीच होती. म्हणजेच, तिने घटस्फोट न घेताच दीपकसोबत लग्न केलं होतं. या प्रकारामुळे मोठा गोंधळ झाला आणि हे प्रकरण अनेक दिवसं चर्चेत राहिलं.
मुलगी समाराचं अभिनयात पदार्पण
दीपक तिजोरी (Deepak Tijori) यांच्या मुलीचं, समारा तिजोरीचं, देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे. समाराने 2022 मध्ये ‘मासूम’ या वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता, ज्यामध्ये बोमन इराणी आणि उपासना सिंह यांसारखे कलाकार होते. समारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि ती अनेकदा तिच्या आई शिवानीसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या