Gautami Patil on Star Pravah : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. महाराष्ट्रातील अनेक डान्स स्टेज तिने तिच्या डान्सने दणाणून सोडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तिने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, सध्या ती एका वेगळ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Gautami Patil on Star Pravah)

गौतमी, धनंजय पोवार अन् छोटा पुढारीचा संवाद व्हायरल 

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ती स्टार प्रवाहवरील या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, या शोमध्ये रीलस्टार धनंजय पोवार आणि महाराष्ट्रात छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे (Dhananjay Powar and Ghanshyam Darode) देखील आले. यावेळीचा गौतमी, धनजंय पोवार ( Dhananjay Powar) आणि छोटा पुढारीदरम्यान झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Gautami Patil on Star Pravah)

गौतमी लग्नाबद्दल काय विचार केलाय?

या व्हिडीओमध्ये धनंजय पोवार गौतमीला विचारतो की, गौतमी लग्नाबद्दल काय विचार केलाय? ..यावर प्रत्युत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली...काय बोलू मी आता, अहो म्हणू की काय म्हणू? दरम्यान, गौतमीने असं म्हटल्यानंतर धनंजय पोवार म्हणतो, माझ्याबद्दल नाही बोलत मी...घनश्यामबद्दल बोलत आहे. दरम्यान, घनशामचं नाव काढताच गौतमी म्हणाली, हे माझ्या लहान भावासारखं वाटतंय.

दरम्यान, गौतमीसमोर लग्नाचा विषय काढलेला असताना घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारीच कळी खुललेली पाहायला मिळाली. मात्र, गौतमीने जागेवर त्याला भाऊ करुन टाकलेले पाहायला मिळाले.  (Gautami Patil on Star Pravah)

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil on Star Pravah) सध्या टेलिव्हिजन कलाकार म्हणून पुढे येऊ लागली आहे. यापूर्वी ती मराठी गाण्यांमध्ये डान्सर म्हणून काम करताना दिसत होती. महाराष्ट्रातील अनेक स्टेजवर डान्ससाठी तिला बोलावलं जायचं. मात्र, आता ती टेलिव्हिजन कलाकार म्हणून वेगळी ओळख मिळवत आहे. स्टार प्रवाहवरील वेगवेगळ्या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Gautami Patil on Star Pravah)

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Hrithik Roshan and Rekha: अन् रेखाने ‘त्यावेळी’ हृतिक रोशनचा गाल पकडून सर्वांसमोर ओठाचा किस घेतलाच! वाद वाढल्यानंतर…

Actress Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर 4 वर्षांनी समंथा रुथ प्रभूने रिमुव्ह केला 'तो' टॅटू