एक्स्प्लोर

OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

Dhanush And Mammootty: धनुष अन् ममूटी एकाच स्क्रीनवर झळकणार, चित्रपटाचं नाव काय? कधी होणार रिलीज?

OM chapter 1: भारतीय सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार (South Superstar) एकत्र एका सिनेमासाठी येणार आहेत. तामिळ सुपरस्टार धनुष (Dhanush) अन् मल्याळम सिनेमातील अभिनेता ममूटी (Mammootty) हे दोघेही एक सिनेमासाठी एकत्र येणार आहेत 'OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood' असे चित्रपटाचे नाव असून,  या सिनेमातून दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाले आहेत. हे दोन्ही कलाकार साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार असून, या चित्रपटातून आपल्याला एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव पाहायला मिळणार आहे.  

धनुष अन् ममूटी एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज? (Dhanush And Mammootty will Share screen in OM chapter 1)

या महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या केंद्रस्थानी RTake Studiosचे संस्थापक आणि निर्माता श्रद्धा अग्रवाल आहेत.  ज्यांच्या दूरदृष्टीने या दमदार सहयोगाला प्रत्यक्षात आणण्यात मोलाची भूमिका बजावलीये.   एका भव्य प्रोजेक्टसाठी विविध इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणणे,  हे प्रादेशिक सीमा ओलांडणारा सिनेमा निर्माण करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. 'OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood'  या बिग बजेट सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा अशा सिनेमांच्या संकल्पनेला प्रोत्साहन देत आहे, जिथे दमदार स्टोरी अन् नेत्रदिपक यांचा मिलाफ होऊन एक  अद्वितीय पॅन इंडिया सिनेमॅटिक अनुभव निर्माण होतो.

दोन विविध इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांना एकत्र आणण्याबाबत श्रद्धा अग्रवाल म्हणाली की,  'एक निर्माता म्हणून आमचा एकच दृष्टिकोन राहिला आहे,   आम्ही सिनेमा तयार करावा, जो लोकांना सिनेमा, चित्रपट उद्योगांना आणि प्रेक्षकांना जोडणारा ठरेल. 'OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood' या चित्रपटासाठी धनुष आणि ममूटी यांना एकत्र आणणे RTake Studiosसाठी अत्यंत खास क्षणाची बाब आहे. दोघेही आपआपल्या इंडस्ट्रीत दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत.  दोन दिग्गज कलाकारांना एकाच पडद्यावर एकत्र आणण्याची संधी निर्माण करणे, हा आमच्यासाठी रोमांचक प्रवास  राहिला आहे'.

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित 'OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood' या सिनेमात धनुष, ममूटी, साई पल्लवी, श्रीलीला, नसीरुद्दीन शाह आणि इंद्रन्स या दमदार कलाकारांची भूमिका आहे.  या सिनेमाचे संगीत साई अभ्यंकर यांनी तयार केले असून,  प्रतिष्ठित कलाकार एकत्र आल्यामुळे, या सिनेमासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता अधिक वाढली आहे. माहितीनुसार, हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
Embed widget