Sachin Pilgaonkar : साधारण 20 वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय' (Sachinmay) नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी (Sachin Pilgaonkar) गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील 'सचिनमय' या नावानेच रिलीज केला गेला. या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं.


या अल्बममधील सगळीच गाणी ही लोकसंगीताचा बाज असलेली, पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं वाटतं. या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं 'धनगर राजा' हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हंणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडीओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी आणण्याचं सागरिका म्युझिकने ठरवलं. गुढी पाडव्याचं निमित्त साधत या गाण्याचा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेलवर रिलीज केला गेला. मराठी मधील हा बहुतेक पहिलाच संपूर्ण अ‍ॅनिमेटेड म्युझिक व्हिडीओ असेल.



सचिन पिळगांवकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रत्यय त्यांच्या गाण्यांतून गाण्यातून दिला आहे. 'सचिनमय' या अल्बम मधील सर्वच गाणी ही लोकगीताच्या बाजाची आहेत. जसं शेतकरी गीत, कोळीगीत, पेंद्याने आपल्या मित्रासाठी म्हणजेच श्रीकृष्णासाठी गायलेलं बोबडा गीतं, आणि धनगर राजा हे गीत आणि हे प्रत्यक गीत सचिनजींनी त्या त्या गाण्याच्या बाजानुसार गायलं आहे, म्हणूनच हा अल्बम  'सचिनमय' आहे. सचिनजींच्या आवाजातील धनगर राजाची ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha