Grammy Awards 2022 :  64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे (Grammy Awards 2022) आयोजन लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डनच्या एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. हा सोहळा जानेवारीमध्ये लॉस अँजेलिस येथे पार पडणार होता. पण कोरोनामुळे हा सोहळा पुढे ढकलण्या आला. ग्रॅमी हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 28 कॅटेगिरीमधील ग्रॅमी पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले.  64 व्या ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या संगीत क्षेत्रातील कलाकारांची नावे पाहूयात. 


64वा  ग्रॅमी पुरस्कारामधील बेस्ट न्यू आर्टिस्ट या कॅटेगिरीमधील पुरस्कार हा ओलिविया रोड्रिगोला देण्यात आला तर  साँग ऑफ द इयर अवॉर्ड हे लीव द डोर ओपन या गाण्यानं पटकवला. पाहूयात विजेत्यांची संपूर्ण यादी-
बेस्ट न्यू आर्टिस्ट- ओलिविया रोड्रिगो (Olivia Rodrigo)
साँग ऑफ द इयर- लीव द डोर ओपन (Leave the door open)
बेस्ट रॉक अल्बम - फू फाइटर्स (Foo Fighters)
बेस्ट रॉक साँग- फू फाइटर्स 
बेस्ट रॉक परफॉर्मेंस- फू फाइटर्स 
बेस्ट कंट्री अल्बम- स्टार्टिंग ओवर
बेस्ट प्रोग्रेसिव अल्बम- लकी डे
बेस्ट रॅप साँग- केन्ये वेस्ट
बेस्ट चिल्ड्रन अल्बम- फालू
बेस्ट कोरल परफॉर्मेंस- गुस्तावो डुडामेल, ग्रँटा गेशॉन, ल्यूक मॅकंडारफर
बेस्ट क्लासिकल कंटेम्पररी कम्पोजिशन- कॅरोलीन शॉ
बेस्ट पॉप सिंगर अल्बम- लव फॉर सेल (Love For Sale)
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस-  ओलिविया रोड्रिगो
बेस्ट डांस/इलेक्ट्रनिक रिकॉर्डिंग- रूफुज डू सोल
बेस्ट म्यूजिक एडुकेटर- स्टीफन कॉक्स
प्रोड्यूसर ऑफ द इयर- जॅक एंटोनोफ
ट्रेडिशनल पॉप अल्बम- लव फॉर सेल(Love For Sale)


ए आर रहमानदेखील ग्रॅमी सोहळ्यात सहभागी!


भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.  


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha