एक्स्प्लोर

Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग

Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई आणि परिसरासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, अनेक भागांत शाळांना देखील सुट्टया जाहीर करण्यात आल्यात.

Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: आठवडाभरापासून मुंबईसह (Mumbai Rains) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain Updates) पावसानं धुमाकूळ घातलाय. राज्यभरात अनेक भागांत मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भीषण पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक ठिकाणी तर जनजीवन विस्कळीत झालंय. पण, सोमवारी तर पावसानं सर्वांचीच झोप उडवली. रायगड, चिपळुणात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तर, मुंबईसह उपनगरांत सखल भागांत पाणी साचलेलं. तर, मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्याचा (Pune Rain) संपर्क तुटला. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली आणि अनेकजण घाटातच अडकून पडले. खरं तर मुंबई-पुणे प्रवास (Mumbai-Pune Expressway) सुखकर होण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 च्या प्रवेशद्वारावर सोमवारी पहाटे अचानक दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आलेली. जवळपास १०० टन ढिगारा पुलावर पडला होता. त्यामुळे अनेकजण अडकून पडलेले. त्यात एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसुद्धा होती. तब्बल 9 तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मराठी अभिनेत्री (Marathi Actress) शूटसाठी मुंबईला पोहोचली. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत एक पोस्टही लिहिलीय.  

मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर नेमकं काय म्हणाली? (Dhanashri Kadgaonkar Stuck In Mumbai Pune Expressway Traffic)

मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर म्हणाली की, "माझ्यासाठी, मी नेहमीच दुसऱ्या बाजूला असायचे, जसे की मुसळधार पाऊस, एखादा अपघात किंवा भूस्खलनामुळे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीच्या बातम्या पाहणं... पण काल ​​[6 जुलै 2026] मी स्वतः त्याचाच एक भाग होते... अशा प्रकारे 9 तास अडकून पडणं खूपच थकवणारं आणि निराशाजनक होतं..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

पुढे बोलताना धनश्री काडगांवकर म्हणाली की, "मला मासिक पाळी आली होती, बाथरूमला जायची तीव्र इच्छा होती पण जाता येत नव्हतं... फूड कोर्टवर उतरायचं होतं आणि काहीतरी घ्यायचं होतं पण जमलं नाही...गुडघाभर पाणी साचलेलं, कुठे ओलं व्हा... आजारपण आत्ता परवडणारं नव्हतं , कारण खूप शूट लागलं होतं..."

"माझा ड्रायव्हर मला बोलत होता... मॅडम आपण परत पुण्याला जाऊयात. पण, आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो... टेलिकास्ट अडकला होता म्हणून, शेवटी मी हळुहळू का होईना पण सेटवर पोहोचले. निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही पण देवापुढं इतकीच प्रार्थना की, कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस...", असं धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिक महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनातला ताईत बनली. राणादा, अंजली या जोडीवर रसिकांनी अमाप प्रेम केलं. म्हणून ते टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होते. आज जरी मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी, या मालिकेला आणि त्यातल्या कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. राणादा आणि अंजली बाईंवर प्रेक्षकांनी प्रेम केलंच, पण त्यासोबत मालिकेत आणखी एक जोडी होती, राज आणि नंदिनीची.  नंदिनीचा कावेबाज स्वभावही रसिकांना आवडला. म्हणून नंदिनी राणादाच्या वहिनीसाहेब म्हणून लोकप्रिय झाली. आता धनश्री वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget