Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द फेम गेम' (The Fame Game) या वेबसिरीजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माधुरीच्या करिअरला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. माधुरीने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले असून ती लक्झ्युरियस लाईफ जगते. माधुरीला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. माधुरीकडे नेमक्या कोणत्या कार आहेत ते जाणून घेऊयात.
माधुरीच्या गाड्यांचं कलेक्शन :
माधुरीकडे Mercedes Maybach S560 ही कार आहे. या कारची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. याशिवाय माधुरीकडे जर्मन लक्झरी कार मर्सिडीज एस क्लास 450 आहे. ज्याची किंमत सुमारे 1.3 कोटी रुपये आहे. माधुरी अनेकदा कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी या कारमधून फिरते. माधुरीच्या सर्वात महागड्या कारमध्ये रेंज रोव्हर वोगच्या कारचाही समावेश आहे. या कारची किंमत साधारण 2.31 कोटी ते 3.41 कोटी रुपये आहे. माधुरी रेंज रोव्हर स्पोर्ट्सचीही फॅन आहे. त्याची किंमत सुमारे 91 लाख ते 2.1 कोटींच्या दरम्यान आहे.
इतकंच नाही तर, मर्सिडीज GLS 350D सुद्धा माधुरीच्या लक्झरी कारच्या ताफ्यात सामील आहे. या कारची किंमत सुमारे 88 लाख आहे. याशिवाय माधुरीकडे Skoda Octavia देखील आहे. ज्याची किंमत 27 लाख ते 30 लाखांपर्यंत आहे. एक इनोव्हा क्रिस्टा आहे ज्याची किंमत 9.5 लाख रुपये आहे.
एकूणच, माधुरीकडे एकापेक्षा एक अशा आलिशान कार आहेत. माधुरीचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांनाही या सर्व गाड्या खूप आवडतात.
महत्वाच्या बातम्या :
- Alia Bhatt and Ranbir Kapoor : अखेर मुहूर्त ठरला! आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे, 'ब्रह्मास्त्र' रिलीज होताच लग्न
- Radhe Shyam : प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटाची जादू, पहिल्या दिवशी इतक्या कोटींचा गल्ला
- Anushka Sharma : ‘चकदा एक्सप्रेस’साठी जोरदार तयारी, अनुष्का शर्मा क्रिकेटच्या मैदानावर गाळतेय घाम!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha