Radhe Shyam Box Offiec Collection : अभिनेता प्रभासच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभासने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. प्रभासचा 'राधे श्याम' हा चित्रपट नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते डोळे लावून बसले होते. राधे श्याम चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या बिग बजेट चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. राधे श्याम चित्रपट पहिल्या दिवशी हिंदी भाषेत चाहत्यांना प्रभावित करण्यात कमी पडला आहे.


बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, राधे श्यामने हिंदी भाषेत बॉक्स ऑफिसवर सुमारे 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला साऊथमध्ये चांगली ओपनिंग मिळाली आहे हा चित्रपट चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरलेला दिसत नाही. या चित्रपटाने हिंदीतील प्रेक्षकांची निराशा केली आहे. चाहते प्रभासच्या चित्रपटाची खूप वाट पाहत होते. पण यावेळी राधे श्यामऐवजी अनुपम खेर यांचा 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.


'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासोबत घोडदौड
प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटासोबत अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, द काश्मीर फाइल्सने पहिल्या दिवशी सुमारे 3.25 कोटींचा व्यवसाय केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha