एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये महादेवही दिसणार; आदित्य धरच्या 'उरी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला 'हा' दिग्गज अभिनेता साकारणार

Ranbir Kapoor Ramayana: 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर 'भगवान श्रीरामा'च्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी (Sai Pallavi) 'माता सीते'ची भूमिका साकारणार आहे.

Mohit Raina Will Play Lord Shiva In Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी सिनेमा, 'रामायण' (Ramayana) बाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. या सिनेमाचं बजेट 4000 कोटी असल्याचं सांगितलं जातंय, आणि जसजसे या सिनेमाबाबत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत, तसतशी या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टीझरनं हा उत्साह एका पूर्णपणे नव्या पातळीवर नेऊन ठेवलाय. तसेच, सध्या सिनेमाच्या स्टारकास्टबाबत चर्चा रंगलीय. अशातच आता, समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार, या दिग्गज कलाकारांच्या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडणार आहे. छोट्या पडद्यावर 'भगवान शंकरा'ची (Lord Shiva) भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला एक अभिनेता, आता मोठ्या पडद्यावरही त्याच अवतारात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झालाय.

स्टारकास्टमध्ये पॉवरफुल कॉम्बिनेशन

'रामायण' सिनेमात रणबीर कपूर 'भगवान श्रीरामा'च्या (Prabhu Shree Raam) भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी (Sai Pallavi) 'माता सीते'ची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात 'रावण' साऊथ सुपरस्टार यश साकरणार आहे. तर, 'हनुमाना'च्या भूमिकेत सनी देओल आणि 'लक्ष्मणा'च्या भूमिकेत रवी दुबे दिसणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'भगवान शंकरा'ची भूमिका मोहित रैना (Mohit Raina) साकारण्याची शक्यता आहे, ज्यानं यापूर्वी याच अवतारात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir__kapoor82)

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास 

मोहित रैना याचा जन्म 14 ऑगस्ट 1982 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात 2004 मध्ये 'अंतरिक्ष' (Antariksh) या टीव्ही मालिकेद्वारे केली. त्यानंतर, 2008 मध्ये ते 'डॉन मुथू स्वामी' (Don Muthu Swami) या बॉलिवूड सिनेमात झळकले. यानंतर, मोहित यांनी 'चेहरा' (Chehra) आणि 'गंगा की धीज' (Ganga Kii Dheej) यांसारख्या टीव्ही सीरिअल्समध्येही काम केलंय. मात्र, 2011 मध्ये 'देवों के देव... महादेव' (Devon Ke Dev... Mahadev) या टीव्ही सीरिअलद्वारे त्यांना खरी ओळख मिळाली. या सीरिअलमध्ये भगवान शंकराची भूमिका साकारल्यामुळे मोहित हे नाव घराघरांत पोहोचलं. मोहित यांनी केवळ टीव्ही सीरिअलमध्येच काम केलं नाही, तर आदित्य धर यांच्या 'उरी' (Uri) या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) या सुपरहिट सिनेमात मुख्य भूमिका निभावली. याव्यतिरिक्त, ते 'शिद्दत' (Shiddat), 'मिसेस सीरियल किलर' (Mrs. Serial Killer) आणि 'इश्क-ए-नादान' (Ishq-e-Nadaan) या कलाकृतींमध्येही दिसले. 'काफिर' (Kaafir) आणि 'मुंबई डायरीज' (Mumbai Diaries) या वेब मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक झालं.

मोहित रैनाचं नेटवर्थ (Mohit Raina Net Worth)

अभिनेत्याच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, जवळपास दोन दशकांच्या करिअरमध्ये मोहित रैनानं इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2025 पर्यंत त्यांचं नेटवर्थ 64 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातंय. तर, त्याची दरमहा कमाई तब्बल 10 लाख रुपये असल्याची सांगितली जातेय. 

दोन पार्ट्समध्ये रिलीज होणार 'रामायण' (Ramayan Movie Released In Two Parts)

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' दोन पार्ट्समध्ये रिलीज केली जाणार आहे. पहिला पार्ट दिवाळी 2026 च्या आसपास रिलीज होणार, तर दुसरा पार्ट 2027 मध्ये रिलीज केला जाणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

4000 Crore Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये 53 वर्षांची 'ही' अभिनेत्री साकारणार मंथरा; कधीकाळी होती मनीषा कोइरालाची बॉडी डबल

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget