एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?

Deool Band 2 Box Office Collection Day 1: पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत 'देऊळ बंद 2' प्रदर्शित करण्यात आला.

Deool Band 2 Box Office Collection Day 1: 2013 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'देऊळ बंद' (Deool Band) या सिनेमानं मराठी (Marathi Movie) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर (Deool Band 2 Box Office Collection) मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या सिनेमानं त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची' या बहुचर्चित सिक्वेलनंही प्रदर्शित होताच मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे.

पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत 'देऊळ बंद 2' प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः गर्दी केली. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा ब्लॉकबस्टर ठरतोय.

पहिल्या दिवशी 'देऊळ बंद 2'ची कमाई किती? (Deool Band 2 Box Office Collection)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी, 'देऊळ बंद 2' नं 1,175 शोजमधून 2.45 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. यामुळे, आतापर्यंतचं भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 2.89 कोटी आणि एकूण निव्वळ उत्पन्न 2.45 कोटी इतकं झालं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल (Deool Band 2 First Day Collection)

मुंबईतील मराठीबहुल भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ परिसरातही 'देऊळ बंद 2'ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. या भागातील अनेक थिएटरचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून, तिकीट खिडक्यांवर गर्दी झाली आहे. 'बुक माय शो' या ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाल्याचं दिसून आलं.

सोशल मीडियावरही 'देऊळ बंद 2'ची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं आहे.

या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते.

वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या भव्य चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरला आहे.

प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे 'देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.

'देऊळ बंद 2'ला विक्रमी प्रतिसाद (Deool Band 2 Record)

पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील 500 सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे 2 हजारांहून अधिक शो प्रदर्शित झाले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये 'देऊळ बंद 2'चे तब्बल 25 शो हाऊसफुल्ल झाले आहेत. एका मराठी चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा सुरू आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपट प्रदर्शित करताना मध्यरात्रीचे शो, विशेष मुहूर्त किंवा पारंपरिक दिवसांऐवजी वेगळ्या दिवशी रिलीज करण्याचे प्रयोग केले जातात. त्याच धर्तीवर 'देऊळ बंद 2' हा चित्रपट पारंपरिक शुक्रवारऐवजी थेट गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रयोगालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली आणि मराठी सिनेमातील सर्वात चर्चित आणि दमदार ओपनिंगपैकी एक ओपनिंग चित्रपटाला मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget