एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection Day 20: 'देऊळ बंद 2'ची कमाई दमदार; थेट रितेश देशमुखच्या हिट सिनेमाला दिला धोबीपछाड, एकूण कमाई ऐकाल तर...

Deool Band 2 Box Office Collection Day 20: 'देऊळ बंद 2' थिएटर्समध्ये प्रदर्शित झाल्यापासून मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय.

Deool Band 2 Box Office Collection Day 20: सध्या मराठी सिनेसृष्टीला (Marathi Film Industry) सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या काही महिन्यांत बॅक टू बॅक आलेल्या मराठी सिनेमांनी (Marathi Film) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) बॉलिवूड सिनेमांची (Bollywood Movie) गणिती बिघडवली आणि धमाकेदार कमाई केली. मराठी सिनेमांनी धुवांधार कमाई करून कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. 'देऊळ बंद 2' हा 2026 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा असून, सामाजिक आशय, रहस्य आणि थरार यांचा संगम असलेल्या कथानकामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. श्रद्धा, अंधश्रद्धा, धर्म आणि समाजातील वास्तव यांवर भाष्य करणारा हा सिनेमा 'देऊळ बंद'चा (Deool Band) सीक्वेल आहे. सध्या या सिनेमानं कमाईच्या बाबतीत कोट्यवधींची उड्डाणं घेतली आहेत. 

थिएटर्समध्ये प्रदर्शित झाल्यापासून 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) हा मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं अनेक विक्रम मोडीत काढलेत. 

20व्या दिवसाची कमाई (Deool Band 2 BO Collection)

प्रवीण तरडे दिग्दर्शित सिनेमानं 20 व्या दिवशी 1.1 कोटी रुपयांची कमाई केलीय. 19 व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत 4.34% घट झाली असली, तरीही या सिनेमानं एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. या सिनेमानं 62 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि 73.16 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय.हा सिनेमा लवकरच 75 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.

चित्रपटातील कलाकारांच्या दमदार अभिनयासह दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंनाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. सामाजिक विषय मांडतानाच मनोरंजनाचा समतोल साधण्यात 'देऊळ बंद 2' यशस्वी ठरल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं उल्लेखनीय कामगिरी केली असून, 2026 मधील यशस्वी मराठी सिनेमांपैकी एक म्हणून त्याची गणना केली जातेय. मराठी प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांकडूनही सिनेमाचं कौतुक करण्यात आलंय.

'देऊळ बंद 2'ची आठवड्याची कमाई (Deool Band 2 Weekly Collection)

'देऊळ बंद 2' सिनेमानं पहिल्या आठवड्यात 30.2 कोटी रुपयांची कमाई केलीय. दुसऱ्या आठवड्यात सिनेमानं 22.4 कोटींचा गल्ला जमवला आहे. 16व्या दिवशी सिनेमानं 1.4 कोटी रुपये कमावलेत. तर, 17व्या दिवशी 2.6 कोटी रुपये, 18 व्या दिवशी 3.15 कोटी रुपये, 19 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये आणि 20 व्या दिवशी 1.1 कोटी रुपयांची कमाई केलीय.

'देऊळ बंद 2' मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा
 
'देऊळ बंद 2' मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी सिनेमा ठरलाय. या सिनेमानं रितेश रितेश देशमुखच्या 'वेड'ला मागे टाकले आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १० चित्रपटांची यादी पाहता, 105.64 कोटी रुपयांची कमाई करून 'राजा शिवाजी' पहिल्या स्थानावर आहे. 90 कोटी रुपयांच्या कमाईसह 'सैराट' दुसऱ्या स्थानावर आहे. 76.28 कोटी रुपयांच्या संकलनासह 'बाईपण भारी देवा' तिसऱ्या क्रमांकावर आहे. 62 कोटी रुपयांच्या कमाईसह 'देऊळ बंद 2' चौथ्या स्थानावर आला आहे. 61.2 कोटी रुपयांची कमाई करणारा 'वेड' पाचव्या स्थानावर आहे.

'नटसम्राट' (42 कोटी रुपये) सहाव्या स्थानावर आहे; त्यानंतर 'पावनखिंड' (37.72 कोटी रुपये) सातव्या, 'लय भारी' (37 कोटी रुपये) आठव्या, 'कट्यार काळजात घुसली' (35 कोटी रुपये) नवव्या आणि 'ठाकरे' (31.6 कोटी रुपये) दहाव्या स्थानावर आहेत. या चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 4: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'नंतर मराठी सिनेसृष्टीत आणखी एक सुपरहिट फिल्म; हॉरर-कॉमेडीचा जादूई फॉर्म्युला हिट, 4 दिवसांत वसूल केलं 66% बजेट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget