Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही तिच्या वेगवेगळ्या लूक्सनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्युरी आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच दीपिकानं क्लासी लूक केला होता. ब्लँक कलरचा सूट आणि गळ्यामध्ये एक पँथरची डिझाइन असलेला नेकलेस असा लूक दीपिकानं केला होता. जाणून घेऊयात दीपिकाच्या या नेकलेसच्या खास गोष्टी आणि किंमत...
दीपिकाच्या नेकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये आहे. हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस 19.05 कॅरेटचा आहे. दीपिकानं शेअर केलेल्या खास फोटोमध्ये हा नेकलेस दिसत आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे दीपिका सध्या चर्चेत आहे. दीपिकने तेथील भारतीय पॅव्हेलियनमध्ये लोकांना संबोधित करताना सांगितले की, 'एक दिवस कान्स भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची प्रतिष्ठा मोठी होईल.'
पाहा फोटो-
दीपिकाचा काही दिवसांपूर्वी गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. दीपिकाच्या आगामी चित्रपटाची वाट तिचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत.
हेही वाचा :
- Cannes Film Festival 2022 : अमृता फडणवीसांची 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी; ट्विटरवर शेअर केला फोटो
- Kon Honaar Crorepati : ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ रंगणार! 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व होणार सुरू
- Dharmaveer : पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई; प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद कायम