Kon Honaar Crorepati : ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. 


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते.  संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.  'आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असं नव्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. 


हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम सचिन खेडेकर लीलया पार पाडतात. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातलं खूप मोठं नाव असल्यानं ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात.  प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊन, त्याला कार्यक्रमाची माहिती देऊन  त्यांना   बोलतं करून सचिन खेडेकर सूत्रसंचालकाची धुरा  उत्तमरीत्या सांभाळतात. प्रेक्षकांमध्येही 'कोण होणार करोडपती', या कार्यक्रमाविषयी उत्सुकता असते.


गेल्या  पर्वामध्ये  सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. प्रत्येक खेळात कोणी  जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं  सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे. 23 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात झाली होती. 


संबंधित बातम्या


Cannes Film Festival 2022 : अमृता फडणवीसांची 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी; ट्विटरवर शेअर केला फोटो


Dharmaveer : पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई; प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद कायम