Amruta Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्या आता 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला पोहोचल्या आहेत.
अमृता फडणवीस 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला पोहोचल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांची बरीच गाणी रिलीज झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
अमृता फडणवीस यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे, 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' साठी पोहोचले आहे. अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट आणि त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. कान्स फिल्म फेस्टिवलला 17 मे पासून सुरुवात झाली आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे.
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' कलाकार सहभागी
75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या