एक्स्प्लोर

दीपिका पदुकोण की आलिया भट्ट? कोण जास्त शिकलं? एकीची दहावी तर, दुसरीची..

Deepika Padukone and Alia Bhatt: दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघींनीही कॉलेज शिक्षण पूर्ण केले नाही.

Deepika Padukone and Alia Bhatt: बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या प्रसिद्ध अॅक्ट्रेसचा समावेश होतो. दोघेही फॅमिलीला टाईम देत आपल्या करिअरकडे लक्ष देतात. दीपिका नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधील असूनही  तिनं बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं स्थान निर्माण केलं. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा तयार केली.  दुसरीकडे, चित्रपट पार्श्वभूमीतून आलेल्या आलिया भट्टने तिच्या मेहनतीने लोकांना तिच्या अभिनयाच्या प्रेमात पाडले आहे.  दोघांचा प्रवास तसा वेगळाच. वैयक्तिक असो किंवा अभिनयातील कारकीर्द, दोघांनी बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे.  मात्र, शिक्षणाच्याबाबतीत त्या दोघी सारख्याच आहेत. दोघींनीही पदवी मिळवलेली नाही.

दीपिका पदुकोणचं किती शिक्षण झालं?

2017 साली हेमा मालिनी यांची बायोग्राफी 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' लाँच  करण्यात आले.  या लाँचवेळी दीपिकाने आपल्या  शैक्षणिक पात्रतेचा खुलासा केला. तिनं सांगितलं की, "यश मिळवण्यासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक असते, म्हणूनच करिअरसाठी कॉलेज सोडले", असं दीपिका म्हणाली.  दीपिकाने स्पष्ट केलं की, मॉडेल म्हणून यशाची शिडी चढत असताना अभ्यास सुरू ठेवणे  कठीण होत चालले होते. यामुळे अभिनेत्री 11वी आणि 12वी  पूर्ण करू शकली नाही. त्यानंतर तिनं डिस्टेंस शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेही शक्य झाले नाही. त्यामुळे अभिनेत्रीचं 12पर्यंत शिक्षण  घेतलं आहे. 

आलिया भट्टचं किती शिक्षण झालं?

आलिया भट्टने जमनाभाई नरसी शाळेतून शिक्षण घेतले आहे. परंतु, चित्रपटांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अभिनेत्रीने शिक्षण सोडले.  फार कमी लोकांना माहित असेल की, आलिया भट्टने फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.  दरम्यान,  ती एक हुशार विद्यार्थी होती. तिनं दहावीत 71 टक्के गुण मिळवले होते.

आलिया भट्टने शाळा का सोडली?

आलिया भट्टला दोन  वर्षांची असल्यापासून  अभिनेत्री व्हायचं होतं.  तिनं ठरवलं होतं की, बारावीनंतर शिक्षण घेणार नाही.  पण जेव्हा तिला स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटाच्या   ऑडिशनबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तिनं बारावीची परीक्षा दिली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसची ट्रोफी जिंकली, पण चारचाकी अजूनही मिळाली नाही; गौरव खन्नाचा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

'ओ तेरी !' सुनील ग्रोव्हरनं केली आमिर खानची नक्कल; लग्नावरही उडवली खिल्ली; मिस्टर परफेक्शनिस्टची प्रतिक्रिया व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
Prapti Redkar Diwali: 'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
Pawan Kalyan Divorce: अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?
अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?
Dia Mirza Diwali: दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...
दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...

व्हिडीओ

Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Rajesh Patil and Ajit Pawar: गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
Embed widget