Deepali Sayyed on Rupali Chakankar: तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
Deepali Sayyed on Rupali Chakankar: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या सिनेमावरुन दिपाली सय्यद आणि रुपाली चाकणकर यांच्यात वाद.

Deepali Sayyed Rupali Chakankar: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दिपाली सय्यद (Deepali Sayyad) सध्या आपला आगामी सिनेमा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstien Files) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 19 जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी अलिकडेच पत्रकार परिषद घेत हा सिनेमा रिलीज होणार, असं ठणकावून सांगितलं होतं. यावेळी एबीपी माझाशी बोलताना दिपाली सय्यद या सिनेमाबाबत म्हणाल्या की, 'माझा उदरनिर्वाह या चित्रपटावर आहे मी कलाकार आहे... मला मेंटली टॉर्चर करण्यात येत आहे...' असं दिपाली सय्यद म्हणाल्या. दरम्यान, तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का? असा प्रश्न जेव्हा दिपाली सय्यद यांना विचारण्यात आला, तेव्हा त्या काय म्हणाल्या पाहूयात.
दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांबद्दल काय म्हणाल्या?
शूटिंग पूर्ण झाली आहे, तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, 'त्यांनी पुढाकार तरी घेतला पाहिजे. ते पहिल्यापासून कोर्टाची भाषा बोलत आहेत. आम्ही देखील कोर्टाची भाषा करु. तुम्ही एफआयआर दाखल केली आहे. कोर्टात केस सुरू असताना तुम्ही कोर्टाची भाषा नाही वापरू शकत. पण तुम्ही ते काल पोलीस स्टेशमध्ये जाऊन केलं आहे'.
'तुम्ही इथे या... बसा बोला. बघा.. कुठे का वाटतंय सांगा. आम्हाला जे काही दाखवायचं आहे, लोकांना.. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की, अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या मधली जी रेष आहे, आम्ही ती रेष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमा कोणती बायोग्राफी नाही आहे. ना आम्ही तुमच्या नावाचाही वापर केला आहे, ते देखील आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं. तुम्ही स्वत:वर ओढावून घेताय. ती साकारलेली व्यक्तीरेखा मीच आहे, असं तुम्ही म्हणताय. असं का करताय?', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
ओटीटी प्लॅटफॉर्म स्टेट होल्डर्सवर दबाव टाकला जात आहे का? या प्रश्नावर बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, 'तुम्ही म्हणताय तुमच्यासाठी त्रास आहे, ही गोष्ट आमच्यासाठीही त्रासदायक नाही का? मी कलाकार म्हणून काम करते. मी कधी काय तुम्हाला बोलले? सिनेमा तयार आहे आणि रिलीज होणार', असं दिपाली सय्यद म्हणाल्या. 'त्यांना जर प्रदर्शित होण्यापूर्वी ही फिल्म बघायची असेल, तर आम्ही हा सिनेमा दाखवायला तयार आहोत', असंही यावेळी दिपाली सय्यद म्हणाल्या. दाखल केलेल्या एफआयआरला उत्तर देणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिपाली सय्यद म्हणाल्या, 'एफआयआरला आम्ही उत्तर दिलेलं आहे. रुपाली चाकणकरांनी माझ्यावर 25 कोटींचा दावा टाकला होता. त्याचं उत्तर आम्ही दिलं आहे. दिल्ली कोर्टमध्ये केस फाइल केलेली आहे. 500 कोटींचा दावा आम्ही तुमच्यावर टाकला आहे', असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















