Toxic Box Office: इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?
Toxic Box Office Collection: यशचा 'टॉक्सिक' आजपासून वर्ल्डवाईड सिनेमागृहात रिलीज.

Toxic Box Office Yashs Film: यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) या सिनेमाच्या फर्स्ट लूकची बरीच चर्चा झाली होती. सिनेमाचा टिझर रिलीज (Toxic Film Release) झाला अन् संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत या सिनेमाची चर्चा होऊ लागली. 'टॉक्सिक' हा सिनेमा आज 26 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 'टॉक्सिक' सिनेमाच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. या सिनेमाकडून यशच्या चाहत्यांना (Yash) बऱ्याच अपेक्षा आहेत. हा सिनेमा वर्ल्डवाईड धुमाकूळ घालणार यात शंका नाही. आता हा सिनेमा ओपनिंग डेमध्ये धुमाकूळ (Advance Booking) घालण्यास सज्ज झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमा किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाची जोरदार चर्चा (Toxic Box Office Yashs Film Creates a Storm)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'टॉक्सिक' हा सिनेमा वर्ल्डवाईड 110 ते 120 कोटींपर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन करु शकेल, अशी शक्यता आहे. 'टॉक्सिक' हा सिनेमा ओपनिंग डेलाच 100 कोटींचा आकडा पार करु शकेल, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. कोईमोईच्या रिपोर्ट्सनुसार, भारतात 'टॉक्सिक' हा चित्रपट 82 ते 89 कोटींपर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन करु शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हिंदी व्हर्जनमध्ये हा सिनेमा जास्त कमाई करु शकेल. हिंदी व्हर्जनमध्ये हा सिनेमा 32 ते 37 कोटींपर्यंत कमाई करु शकेल. तर, कन्नड व्हर्जनमध्ये हा सिनेमा 29 ते 30 कोटींपर्यंत कमाई करु शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तेलुगु व्हर्जनमध्ये 'टॉक्सिक' हा सिनेमा साधारण 11 ते 12 कोटींपर्यंत कमाई करु शकेल, असंही म्हटलं जात आहे. तसेच मल्याळम आणि तामिळ व्हर्जनमधून हा सिनेमा 10 कोटींपर्यंत कलेक्शन करण्याची शक्यता आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, रात्री 8:30 वाजेपर्यंत या सिनेमाने ब्लॉक सीटमध्ये अंदाजे 60 कोटींपर्यंत अॅडव्हान्स बुकिंग केले होते. तर, ब्लॉक केलेल्या सीटशिवाय, 'टॉक्सिक' या चित्रपटाने अंदाजे 44.81 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाचे 1374044 तिकिटांची विक्री झाली आहे. या सिनेमाला 24330 शोज मिळाले आहेत.
'टॉक्सिक' या सिनेमाचे दिग्दर्शन मोहनदास यांनी केले आहे. या सिनेमात यश यांचा डबल रोल असणार असल्याची माहिती आहे. तर, कियारा आडवाणी या सिनेमात यशच्या अपोझिटमध्ये दिसणार आहे. कियारा आणि यशचे या सिनेमात अनेक इंटिमेट सीन्स आहेत. फिल्मच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यश आणि कियारा व्यतिरिक्त या सिनेमात तारा सुतारिया, नयनतारा, रुक्मणि वसंत, हुमा कुरेशी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता हा सिनेमा ओपनिंग डेला किती कोटींचे कलेक्शन करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
बॉलिवूड शोकाकूल! 'फूल और कांटे'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; अजय देवगणला सिनेसृष्टीत केलेलं लाँच























