Urfi Javed : बिहारमधून उर्फी जावेदला धमकावत होता तरुण, बलात्कार आणि खुनाच्या धमक्या, मुंबई पोलिसांकडून अटक
Urfi Javed : उर्फीने तक्रार केली होती की, आरोपी व्हॉट्सअॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत आहे.
Urfi Javed : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला (Urfi Javed) वारंवार जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या संदर्भात उर्फी जावेद हिने गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) फिर्याद दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी बिहारमधील (Bihar) पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली. उर्फीने तक्रार केली होती की, आरोपी व्हॉट्सअॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत आहे. तसेच उर्फी म्हणाली की, आरोपी तिच्या फॅशन स्टाइलवरही आक्षेप घेत होता.
बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी
या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक तपास केल्यानंतर पाटणा शहरातील नवीन गिरी नावाचा तरुण धमकावत असल्याचे आढळून आले. यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा गाठून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाटणा कोतवाली पोलिसांच्या मदतीने आरोपी नवीन गिरी याला हॉटेलमधून अटक करून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे उर्फीने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, नवीन हा तीन वर्षांपूर्वी तिचा ब्रोकर होता आणि त्याच्याकडे उर्फीचा फोन नंबरही होता. आता अचानक त्याने त्या नंबरवर मेसेज पाठवून धमक्या देण्यास सुरुवात केली. नवीन हा त्या नंबरवर कॉल करून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही देत होता. उर्फीने तिच्या तक्रारीसोबत कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते.
वेगवेगळ्या नंबरवरून फोन
नवीन गिरी हा उर्फी जावेदला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावत असे. अशात उर्फी जावेदने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. पुरावा म्हणून अभिनेत्रीने नवीनचे कॉल रेकॉर्डिंग दिले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आता आरोपी नवीनला पकडण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयटी अॅक्ट आणि धमकावण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा 'रिअल इस्टेट ब्रोकर'
पोलिसांनी केलेल्या तपासात नवीन हा रिअल इस्टेट ब्रोकर असल्याचे उघड झाले असून, त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. आरोपीने दावा केला आहे की, उर्फीने त्याचे कमिशन दिले नाही, ज्यामुळे तो अभिनेत्रीला व्हॉट्सअॅपवर वारंवार कॉल करून धमकावत असे. इतकेच नाही तर नवीनने इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर उर्फीविरोधात अपशब्दही लिहिले होते.
इतर बातम्या
Urfi Javed : प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करणारी उर्फी जावेद कोण? कॉन्ट्रोव्हर्सी गर्लबद्दल सर्व काही जाणून घ्या