Cirkus Trailer Launch : बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आगामी चित्रपट 'सर्कस' (Cirkus) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी 'सर्कस'चे पोस्टर आणि एक मजेशीर व्हिडीओ क्लिप शेअर करून चित्रपटातील कलाकारांच्या लूकची झलक शेअर केली होती. त्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याचबरोबर सर्कसचा ट्रेलरही मुंबईत लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर लाँचच्या आधी, सर्कस कलाकारांनी लाल रंगाच्या पोशाखात लोकप्रिय गाणे, ईना मीना डीका देखील रिक्रिएट केले आहे. 


सर्कसच्या युगात घेऊन जाणारा ट्रेलर : 


सर्कस सिनेमाचा ट्रेलर आपल्याला सर्कसच्या युगात घेऊन जातो. रणवीर सिंह इलेक्ट्रिक मॅन म्हणून सर्कसमध्ये प्रवेश करतो. यानंतर सर्कसच्या एकापेक्षा एक चाल बघायला खूप मजा येते. रणवीर सिंग वरुण शर्माला माझ्यासोबत काय झाले हे समजत नाही असे म्हणताना दिसत आहे. यावर वरुण शर्मा म्हणतो, निसर्गाचा करिष्मा याला दुसरं काय म्हणावं? या चित्रपटात रणवीर आणि पूजा हेगडे यांची रोमँटिक केमिस्ट्रीही दमदार दिसत आहे. तर, कलाकारांची कॉमेडी बघताना ट्रेलरमध्येच हसू आवरत नाही. याशिवाय रणवीर सिंहच्या दुहेरी भूमिकेमुळे बराच गोंधळ उडाला आहे. म्हणजेच हा चित्रपट धमाका करणार आहे, हे ट्रेलरवरून तरी सिद्ध झाले आहे.


' सर्कस'ची स्टारकास्ट रणवीर सिंह, पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याशिवाय 'सर्कस'च्या स्टारकास्टमध्ये सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, व्रजेश हिरजी, विजय पाटकर, सुलभा आर्य, मुकेश तिवारी, अनिल चरणजीत, अश्विनी कळसेकर यांचा समावेश आहे. मुरली शर्मा यांचाही सिनेमात समावेश आहे. जॅकलिनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण टीम लाल रंगाच्या वेशभूषेत दिसतेय. तर, सगळेच ईना मीना डीका या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतायत. 






'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' नंतर 'सर्कस' हा रणवीर सिंहचा रोहित शेट्टीबरोबरचा तिसरा सिनेमा आहे. या चित्रपटात रणवीर सिंहची दुहेरी भूमिका आहे. सर्कस हा सिनेमा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Sigham Again: अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'सिंगम अगेन' येणार प्रेक्षकांच्या भेटीस