Cirkus Release Date Out: दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सुपरहिट चित्रपट ‘सूर्यवंशी'नं (Sooryavanshi) बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलीय. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आलीय. सूर्यवंशी चित्रपटाच्या यशानंतर आता रणवीर सिंहच्या 'सर्कस' चित्रपटाबाबत चाहत्यांना उस्तुकता लागली होती. यातच प्रसिद्ध ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनं यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे 'सर्कस' चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिलीय.


तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, 'सर्कस' हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची म्हंटलंय. रोहित शेट्टी- रणवीर सिंह यांचा सर्कस हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनीही सिंबा आणि सूर्यवंशीसाठी एकत्र आले होते. सर्कसमध्ये पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण शर्मासारखे कलाकार झळकणार आहेत.





 


रोहित शेट्टीची यशस्वी दिग्दर्शकांमध्ये गणना केली जाते. रोहित शेट्टीचं मागील 4-5 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. सुर्यवंशी हा कोरोनानंतर बॉलीवूडमधून प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असावा, अशी बॉलीवूड इंडस्ट्रीची इच्छा होती. रोहित शेट्टी हा एकमेव दिग्दर्शक आहे, ज्याचा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येईल, असा अनेकांचा विश्वाच होता. सूर्यवंशी हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असून त्यात अक्षय कुमारनं सूर्यवंशी नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात कतरिना कैफ अक्षयसह मुख्य भूमिकेत झळकली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-