Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. सिंघम (Singham) आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट हिट ठरल्यानंतर आता सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

तरण आदर्शनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिंघम अगेन या चित्रपटाबाबत माहिती दिली. तरण आदर्शनं सोशल मीडियावर सिंघम चित्रपटातील अजयचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे सिंघम अगेनसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात अजय हा भोला चित्रपटातून फ्री झाल्यावर होईल.' सिंघम अगेनची आता अजयचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

2011 मध्ये अजय देवगणचा ‘सिंघम’हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर  2014मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘सिंघम रिटर्न्स’ रिलीज झाला. अजयचा ‘सिंघम 2’ देखील सुपरहिट ठरला. आता आठ वर्षानंतर सिंघम अगेन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Continues below advertisement

अजयचा भोला हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. भोला या चित्रपटात अजयसोबतच तब्बू देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 1 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!