Cirkus : रणवीर सिंहचा (Ranveer Singh) आगामी 'जयेशभाई जोरदार' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रणवीर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच रणवीरच्या 'सर्कस' (Cirkus) सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. रणवीरने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत 'सर्कस'चे पोस्टर शेअर केले आहे. 


'या' दिवशी 'सर्कस' सिनेमा होणार रिलीज


'सर्कस' सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. हा सिनेमा 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडेसह वरुण शर्मा, जॉनी लीवर आणि संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.





'सिंबा'नंतर 'सर्कस'मध्ये रोहित आणि रणवीर एकत्र


रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी त्यांनी 'सिंबा' सिनेमात एकत्र काम केलं होतं. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमातदेखील रणवीरची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता 'सर्कस' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'सर्कस' सिनेमा आधी 15 जुलैला रिलीज होणार असे म्हटले जात होते. पण आता हा सिनेमा 23 डिसेंबरलाच रिलीज होत आहे.


संबंधित बातम्या


Avatar 2 : एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार, प्रत्येकात दिसणार निळ्या विश्वाची जादू!


KGF 2 in South Korea : भारतच नव्हे, दक्षिण कोरियातही दिसली ‘रॉकी भाई’ची जादू! चित्रपट पाहून चाहते म्हणाले...


Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!