एक्स्प्लोर

Chikeezing Movie Teaser: उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?

Chikeezing Movie Teaser: 'चिकीझिंग' चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी आणि मनाला भुरळ घालणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, नेटकरी सोशल मीडियावर भावुक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत या टिझरचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

Chikeezing Movie Teaser: प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जपून ठेवलेल्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणारा नवा कोरा कौटुंबिक चित्रपट 'चिकीझिंग' (Chikeezing Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. स्वतःच्या शाळेपेक्षा बाहेरच जास्त रमणारा एक अवखळ, चुणचुणीत आणि स्वप्नाळू मुलगा म्हणजे 'चिक्या'; आणि आणि त्याचे बालसुलभ भावविश्व व स्वप्नपूर्ती ची रंजक धडपड रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'चिकीझिंग'ची (Chikeezing Marathi Movie) जगभरातील 16 प्रतिष्ठित अशा पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाली असून, आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी आणि मनाला भुरळ घालणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, नेटकरी सोशल मीडियावर भावुक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत या टिझरचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत 'चिकीझिंग' या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. या सुरेख कलाकृतीचे दिग्दर्शन राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी केले आहे. टिझरमध्ये निसर्गरम्य आणि धुक्याची चादर ओढलेल्या हिलस्टेशनच्या मनमोहक वातावरणाची सुरेख पार्श्वभूमी दिसते. दर शनिवारी आपल्या आईसोबत एका आलिशान निवासी शाळेच्या परिसरात जाणारा चिक्या त्या भव्यदिव्य परिसराने पार भारवून जातो. त्या शाळेचे बंद असलेले भव्य लोखंडी प्रवेशद्वार आणि त्याच्या आत दडलेले चकचकीत, समृद्ध जग हे त्याच्या चिमुरड्या मनासाठी एक न उलगडणारे स्वप्नवत विश्व ठरते. टिझरमधील मुलांची धम्माल, गलोलीने केलेले खेळ, साधीसुधी घरे, डोंगराळ भाग आणि चिक्याची गगनभरारी घेणारी नजर थेट काळजाला भिडते. 'चला चला मामाच्या गावाला...' या सुरेल गाण्याची जोड दिल्याने टिझर खऱ्या अर्थाने लक्षवेधी बनला आहे.

या टीझरविषयी दिग्दर्शक म्हणाले की, "चिकीझिंग'चा हा टिझर केवळ चित्रपटाची पहिली झलक नसून, प्रेक्षकांना त्यांच्या हरवलेल्या बालपणाशी आणि निरागस स्वप्नांशी पुन्हा जोडून देणारा एक भावनिक सेतू आहे. हा टिझर चित्रपटाचा खरा आत्मा आणि चिक्याच्या विश्वाची नेमकी ओळख सर्वांसमोर प्रभावीपणे उलगडतो. या चित्रपटाचे संगीत आणि लवकरच रिलीज होणारी गाणी ही सर्व वयोगटातील रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी आमची खात्री आहे. या रुपात आम्ही परिपूर्ण मनोरंजन करणारा कौटुंबिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असून तो नक्कीच रसिकांच्या मनाचा ठाव घेईल..."

चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर या कलाकारांनी अत्यंत सशक्त आणि महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे संवेदनशील लेखन आणि कथा-पटकथा राजेंद्र बगाटे व वैभव कुलकर्णी यांनी लीलया पेलली आहे. छायांकनाची धुरा प्रवीण सोनावणे यांनी सांभाळत निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य कॅमेऱ्यात अचूक टिपले आहे. संगीताची सुमधुर बाजू श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी सजवली आहे. संकलनाची जबाबदारी शेखर गुरव आणि एस शंकर यांनी पार पाडली आहे. कला दिग्दर्शन आणि वेशभूषा सुरेश कुंभार यांनी चोख सांभाळली आहे.

केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर अवघ्या कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा असा हा स्वप्न, कुटुंब आणि आशेचा उत्सव असलेला 'चिकीझिंग' चित्रपट येत्या 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

पाहा 'चिकीझिंग' सिनेमाचा टीझर : 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Mumbai Crime: मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून पोलीस ठाण्यात फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Embed widget