एक्स्प्लोर

Maharashtra Epstein Files Film On Ashok Kharat: कॅप्टन अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर चित्रपट येणार, 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा पोस्टर रिलीज

Maharashtra Epstein Files Film On Ashok Kharat: सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Film On Ashok Kharat: समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद कित्येकदा रुपेरी पडद्यावरही उमटतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून काही अप्रकाशित पैलू उजेडात येतात. आजवर समाजात घडलेल्या अनेक घटना आणि प्रकरणांवर आधारित वास्तवदर्शी चित्रपट बनले आहेत. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणाऱ्या या चित्रपटांनी सरकारी व्यवस्थांनाही धारेवर धरले आहे. नुकतीच घोषणा झालेल्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या मराठी चित्रपटातही (Marathi Movie) संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या अशाच एका गाजलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करून 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे मोशन पोस्टरवर घोषित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी एक आव्हानात्पक पाऊल टाकले आहे. 


Maharashtra Epstein Files Film On Ashok Kharat: कॅप्टन अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर चित्रपट येणार, 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा पोस्टर रिलीज

'आता सगळं उघड होणार...!' ही टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत. या चित्रपटात कॅप्टन भोंदू बाबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर एक पाठमोरी व्यक्ती उभी असल्याचे पाहायला मिळते. या व्यक्तीने पाठीमागे घेतलेल्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. याने कुर्ता-पायजमा आणि जॅकेट असा सभ्य गृहस्थांचा पोषाख परिधान केलेला आहे. त्याच्या चहूबाजूला क्राईम सीनच्या पिवळ्या फिती बांधलेल्या आहेत. त्याच्या समोरील भिंतीवरील काही फोटोंमध्ये 'प्रश्नचिन्ह' आहे. एकावर 'नाशिक' आणि दुसऱ्यावर 'भोंदूबाबा' असे लिहिले आहे. समोरील टेबलवर डाव्या बाजूला तांब्याचा पाण्याचा जग आणि भांडे आहे, तर उजव्या बाजूला पुस्तके, चहाचा ग्लास आणि एलिश हनी आहे. हे सर्व चित्र पाहिल्यावर हा चित्रपट कोणत्या कॅप्टन भोंदूबाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश करणार आणि कोणाची एपस्टिन फाईल ओपन करणार हे चाणाक्ष मराठी प्रेक्षकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. 

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भोंदू अशोक खरातचा कारनामा आता सिनेमातून उलगडणार, शिवसेनेतील महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget