Cannes Film Festival 2024 :  जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मेट गाला 2024 नंतर, आता सर्वांच्या नजरा कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे (Cannes Film Festival 2024 ) लागून राहिल्या आहेत. येत्या 14 मे पासून सिनेमा जगातातील सर्वात मोठा सोहळा सुरू होत असून 25 मे 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. जगभरातील मोठे चेहरे या सोहळ्याच्या रेड कारपेटवर दिसणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तसेच या सोहळ्यात अनेक असाधारण सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. त्याचप्रमाणे कोणते नवे चेहरे दिसणार आणि कोणाचे नाव पुरस्कारांवर कोरले जाणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे 77व्या कान्स पुरस्कार सोहळ्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 



कधी सुरु होणार कान्स फिल्म फेस्टिवल?


कान्स फिल्म फेस्टिव्हल हा 14 मे 2024 रोजी सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 25 मे रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. फेस्टिव्हल डी कान्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार,  13 आणि 14 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 8 अशी वेळ आहे, म्हणजेच भारतीय वेळेनुसार, सकाळी 11.30 ते रात्री 11.30 असणार आहे. तसेच 15 मे ते 25 मे रोजी या सोहळ्याची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 म्हणजेच भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.30 ते रात्री 9.30 अशी वेळ असणार आहे. 


कुठे पाहता येणार कान्स फिल्म फेस्टिवल? 


अधिकृत वेबसाइटनुसार, हा संपूर्ण कार्यक्रम फ्रान्स टिव्हिवर फ्रान्समध्ये प्ररसारित केला जाणार आहे. त्याच्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी ब्रुटवरही प्रसारित केले जाणार आहे. तसेच तुम्ही हा सोहळा युट्युब चॅनल आणि अधिकृत वेबसाईटच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरही पाहू शकता.  लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये रेड कारपेट, प्रेस कॉन्फरन्स आणि इतर काही गोष्टी देखील दाखवल्या जाणार आहेत. 


बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्री रेड कारपेटवर लावणार हजेरी?


दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन ही कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कारपेटवर दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हिरामंडी फेम अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि शोभिता धुलिपाला दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक इन्फ्युएन्सर आणि डिजीटल क्रिएटर्स देखील या सोहळ्यात दिसणार असल्याचं सध्या म्हटलं जातंय. त्यामुळे कोणते बॉलीवूड कलाकार कान्सच्या सोहळ्यात हजेरी लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.                    


ही बातमी वाचा : 


Pravin Tarde : 'मतदानाच्या गर्दीनेच पुण्याचा निकाल स्पष्ट केलाय', मोहोळांची सभा गाजवल्यानंतर मतदानादिवशीच प्रवीण तरडेंनी वर्तवला निकालाचा अंदाज