Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज सकाळी 11 वाजता पेपरलेस बजेट, म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रत्येकालाच या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. अशातच आता मराठी कलावंतांनी देखील यंदाच्या बजेटकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा जाहीर केल्या आहेत. या बजेटमध्ये कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं जावं, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आहे. पाहा कलाकारांच्या अपेक्षा..
सायली संजीव
कोरोना काळात अनेक महिलांनी आपले पती गमावले, घराचा आधार गमावला. त्याचा महिला जर स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छित असतील तर, त्यांच्यासाठी यात काही तरतूद असेल का?
आदिती सारंगधर
एक गृहिणी म्हणून आपल्या सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे आमच्या किचनच बजेट वाढेल का? किराणा भाजीपाला किंमती कमी होतील की, वाढतील?
विजू माने
गेल्या दोन वर्षात चित्रपट व्यवसाय हा खाईत लोटला गेल्यासारखा झाला आहे. विशेष म्हणजे थिएटर्स बंद पडली आहेत. त्या थिएटर्सना दिलासा मिळण्यासाठी त्यांना मालमत्ता कर आणि मनोरंजन करातून सवलत मिळेल का?, अशी विचारणा मला मनापासून करायची आहे. कारण, माझ्या माहितीनुसार 150च्या आसपास थिएटर्स बंद पडली आहेत. ती जर पुन्हा उभी राहिली नाही तर, आपल्या देशाचा चित्रपट व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर काही निर्णय असेल का?
हेही वाचा :
- केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष; जाणून घ्या काही रंजक तथ्य...
- यंदाच्या अर्थसंकल्पातून पीपीएफ खातेधारकांना काय अपेक्षा?
- सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha