Union Budget 2022 :  आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  यंदाचाही अर्थसंकल्प कागदविहीन म्हणजे डिजिटल असणार आहे.  कोरोना महामारीमुळं आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशातील कर प्रस्ताव आणि प्रस्तुती तसेच वित्तीय विवरण अशा सर्व प्रकारच्या कागदपत्रांची छपाई होणार नाही. आपण देखील घरबसल्या मोबाईलवर अर्थसंकल्पाविषयी सर्व माहिती आणि अपडेट्स मिळवू शकता.  


हे अॅप डाऊनलोड करा


अर्थसंकल्पाविषयी सर्व माहिती 'केंद्रीय बजट' (Union Budget) या मोबाईल अॅपवर मिळणार आहे. या अॅपमध्ये आपल्याला अर्थसंकल्पाविषयी सर्व माहिती मिळू शकेल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही माहिती असेल. अर्थसंकल्प मांडल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर आपण बजेट भाषण, वार्षिक वित्तीय विवरण, अनुदान मागणी (डीजी), वित्त विधेयक यासारखी कागदपत्रंही पाहू शकाल.   


असं करा अॅप डाउनलोड


जर तुम्हाला ‘केंद्रीय बजट’ (Union Budget) मोबाईल अॅप डाऊनलोड करायचं असेल तर या स्टेप्स फॉलो करा


हे अॅप आपल्याला गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप्पल अॅप स्टोअरवर मिळेल.  
तिथं सर्च करण्यासाठी Union Budget असं टाईप करा
त्यानंतर आलेलं अॅप डाऊनलोड करा.  
अर्थसंकल्पाविषयी माहिती आपण वेब पोर्टल indiabudget.gov.in वरही पाहू शकाल
अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे की, सामान्य माणूस देखील या पोर्टलवरुन कागदपत्रं डाऊनलोड करु शकतात.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha