एक्स्प्लोर

Border 2 Teaser: 28 वर्षांनंतरही सनी पाजीचा तोच भारदस्त आवाज अन् अंगावर काटा; 'बॉर्डर' 2 सिनेमाचा थरारक 'टीझर' प्रदर्शित

Border 2 Teaser: आज प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर चाहते या चित्रपटाच्या  थिएटरमधील रिलीजची वाट बघत आहेत.

Border 2 Teaser: सनी देओल आणि वरुण धवन स्टार ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. (Border 2 Teaser) हा टीझर पाहिल्यानंतर आणि सनी देओलच्या भारदस्त आवाजातील डायलॉग ऐकल्यावर अंगावर काटे येतात. टीझरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

1997 साली प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक मारली होती. अनेक आठवडे थिएटरमध्ये चाललेल्या या चित्रपटाने भरघोस कमाईदेखील केली. आता 28 वर्षांनंतर सनी देओल पुन्हा एकदा तीच जादू ‘बॉर्डर 2’ मधून दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता अखेर हा सिनेमा तयार झाला आहे. आज प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर चाहते या चित्रपटाच्या  थिएटरमधील रिलीजची वाट बघत आहेत. या टीझरमध्ये वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे तिघेही देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या आर्मी, वायुदल आणि नौदलाच्या वर्दीत दिसत आहेत.

दमदार टीझरने वाढवली उत्सुकता

अवघ्या एका मिनिटाच्या या टीझरची सुरुवात सनी देओलच्या भारदस्त आवाजाने होते. व्हिडीओमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे शत्रूंशी जोरदार लढताना दिसतात. या पार्श्वभूमीत सनी देओल आपल्या जवानांना युद्धासाठी प्रेरित करताना ऐकू येतो.

या टीझरमधील सनी देओलचा एक नवा डायलॉग सध्या चांगलाच चर्चेत आहे. सनी देओल आपल्या दमदार आवाजात म्हणतात, “आवाज कहा तक जाना चाहिए” यावर जवान उत्तर देतात, “यहां तक” हा संवाद ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एका दृश्यात सनी देओल मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटाप्रमाणे हातात तोफ घेऊन जबरदस्त अ‍ॅक्शन करतानाही दिसतोय.

 

रिलीज डेट कधी?

अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बॉर्डर 2’ चा हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड भावतो आहे. अनेक युजर्सनी टीझरवर प्रतिक्रिया केल्यात. अनेकांनी हा टीझर ‘बेस्ट’ असल्याचं  म्हटलंय. विशेषतः सनी देओलचा आवाज ऐकू येताच अंगावर काटा असल्याचंही अनेक जण म्हणालेत. या चित्रपटात मोना सिंह, सोनम बाजवा आणि मेधा राणा या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटाचे निर्माते जेपी दत्ता हेच ‘बॉर्डर 2’ची निर्मिती करत आहेत. हा बहुचर्चित सिनेमा 23  जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget