बॉर्डर 2मध्ये अक्षय खन्ना झळकणार? व्हायरल फोटोवरून चर्चांना उधाण, निर्मात्यांनी एका वाक्यात विषय संपवला
Nidhi Dutta Clears Rumors About Akshaye Khannas Role in Border 2: बॉर्डर 2 हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय खन्ना बॉर्डर 2 चा भाग नसल्याचं निधी दत्ताने स्पष्ट केलं.

Nidhi Dutta Clears Rumors About Akshaye Khannas Role in Border 2: बॉर्डर 2 हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झालेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि सनी देओल यांच्यासह अनेक कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा सिक्वेल बॉर्डर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. काही काळापासून असे वृत्त येत आहे की, अक्षय खन्ना बॉर्डर 2 या चित्रपटाचा भाग असू शकतो, या चित्रपटात त्याची छोटी भूमिका असू शकते, अशी चर्चा आहे. या चर्चांवर निधी दत्ताने मौन सोडले आहे. तिनं एका मुलाखतीत अक्षय खन्ना या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचं स्पष्ट केलं. सध्या निधी दत्ताची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
चित्रपटाच्या निर्मात्या निधी दत्ता यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाच्या कॅमिओवर प्रतिक्रिया दिली आहे. निधी म्हणाली, "नाही हे अजिबात खरे नाही. आम्ही बॉर्डर 2 या चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधला नाही. ही पहिल्या भागाच्या कथेची पुढची कहाणी नाही. तर, भारतीय सैनिकांबद्दल एक नवीन कहाणी सांगणारी एक वेगळीच कथा आहे", असं निधी दत्ताने मुलाखतीत स्पष्ट केलं. "घर कब आओगे" हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अक्षय बॉर्डर 2मध्ये झळकणार का? या चित्रपटात त्याची भूमिका असणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. बॉर्डर 2 मध्ये अक्षय खन्नाची भूमिका नसणार, यावर एका मुलाखतीतून निधी दत्ता हिनं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, "घर कब आओगे" हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अक्षय खन्नाचा फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आला होता. यामुळे अनेकांना वाटले अक्षय खन्ना या चित्रपटाचा भाग असू शकतो. मात्र, तो या चित्रपटाचा भाग नसणार हे स्पष्ट झाले आहे.
बॉर्डर 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओलसोबत अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच महिला कलाकारांमध्ये मेधा राणा आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
























