Boney Kapoor on Janhvi kapoor and Shikhar Pahariya Relation : जान्हवी कपूर (Janhvi kapoor) आणि शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच चर्चेत आहेत.  जान्हवी आणि शिखर हे अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण अद्यापही त्या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. जान्हवी देखील कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं टाळते. आता मात्र बोनी कपूर (Boney Kapoor) यांनीच त्यांच्या नात्याला होकार दिला असल्याचं स्पष्ट झालंय. नुकत्याच झालेल्या एका मुलखतीमध्ये त्यांनी जान्हवी आणि शिखरच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे. 

 

सध्या बोनी कपूर त्यांच्या आगामी 'मैदान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी गेले असता तिथे त्यांना शिखर आणि जान्हवीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या कलाविश्वात सुरु आहे. 

बोनी कपूर यांनी काय म्हटलं?


झूमसोबत संवाद साधताना बोनी कपूर यांनी म्हटलं की, मला शिखर आवडतो. खरं तर जान्हवी आणि त्याच्या नात्यापूर्वी पासूनच मी त्याला ओळखतो. तेव्हापासून माझे त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की तो कधीही जान्हवीचा एक्स होणार नाही. त्याचं जान्हवीशी असो, माझ्याशी असो किंवा अर्जुनशी असो सगळ्यांचे मैत्रीणीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे आमच्या घरात त्याच्यासारखं कोणीतरी येणार याचं आम्हाला जास्त आनंद आहे. 

कोण आहे शिखर पहाडिया?


शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवी आणि शिखर नात्याविषयी आधी गंभीर होते, पण त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या देखील चर्चा होत्या. करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात जान्हवीने तिचं आणि शिखरचं पॅचअप झाल्याचं संकेत दिले होते. पण अद्यापही तिने यावर मौन बाळगलं आहे. जान्हवी आणि शिखरने अलीकडेच खुशी कपूरच्या वाढदिवसाची पार्टी एकत्र एन्जॉय केली. गेल्या महिन्यात जान्हवी तिच्या वाढदिवसाला शिखरसोबत तिरुपती मंदिरात गेली होती. दोघांचे मंदिराबाहेरील अनेक फोटो व्हायरल झाले होते.              

ही बातमी वाचा :