Vijay Deverakonda Filmfare Award : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणून विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) ओळख आहे. त्याच्या सहज अभिनयाने तो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. अर्जुन रेड्डी (Arjun Reddy), गीता गोविंदम (Geeta Govindam), डिअर कॉम्रेड अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून विजयने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. त्याचा चाहतावर्गही तसा बराच मोठा आहे. पण या अभिनेत्याला एकेकाळी प्रंचड ट्रोलिंगला समोरं जावं लागलं होतं.यावर या अभिनेत्याने तब्बल सात वर्षांनी भाष्य केलं आहे. 


विजयने काही वर्षांपूर्वी त्याला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार विकला होता. त्यावेळी त्याने हा पुरस्कार विकल्याने त्याता मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. पण या सगळ्यावर विजयने तेव्हा भाष्य करणं टाळलं होतं. आता सात वर्षांनी त्याने या सगळ्यावर भाष्य केलं असून त्याने हा पुरस्कार का विकला याचं कारण देखील सांगितलं आहे. पण विजयने त्याचा हा फिल्मफेअर पुरस्कार का विकला होता, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


म्हणून विजयने त्याचा फिल्मफेअर पुरस्कार विकला


विजयने नुकतच  Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्यानं म्हटलं की, मला आतापर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार मी अनेकांना देऊनही टाकतो. मला फिल्मफेअरने दिलेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मी लिलाव केला. यातून मला चांगले पैसे मिळाले. जवळपास 25 लाख रुपये मिळाले होते. पण जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दान केले.  घरी ठेवलेल्या एखाद्या दगडाच्या तुकड्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे. 






2016 साली आलेल्या 'पेली चूपुलु' सिनेमातून विजय देवरकोंडाने अभिनयात पदार्पण केलं. यानंतर 2017 साली आलेल्या अर्जुन रेड्डी या सिनेमाने त्याला विशेष पसंती मिळाली. आता विजय हा त्याच्या आगामी 'द फॅमिली स्टार' या सिनेमातून प्रेक्षकांच्या येणार आहे. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमात विजयसह मृणाल ठाकूरसोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. त्याच्या या सिनेमाची प्रेक्षकाही आतुरतेने वाट पाहत आहेत. 


ही बातमी वाचा : 


Amitabh Bachchan : एक नाही, दोन नाही तब्बल 12 वर्षांपासून अमिताभ यांचा 'हा' चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत, नेमकं कारण काय?