Yodha and Baster Box Office : सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) अजय देवगन (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) मुख्य भूमिकेत असलेल्या शैतान सिनेमाची हवा आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटी रुपयांची कमाई केलीये. त्यातच उद्या म्हणजेच 15 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दोन सिनेमे धडक देणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेला योद्धा (Yodha) आणि अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत असलेला बस्तर (Baster) या सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन सिनेमांपैकी बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा अव्वल ठरणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.


योद्धा या चित्रपटात  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्ना यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. पण अद्याप या सिनेमात दिशा पटानीची भूमिका नेमकी काय असणार यासंदर्भात अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच बस्तर या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात अदा शर्मा ही नक्षलवादी चळवळीशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 


ओपनिंग डेला कोणाची होणार सरशी?


सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेल्या योद्धा या सिनेमाने अॅडव्हान्स बुकींमध्ये चांगली कमाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच  सिद्धार्थ आणि दिशाची फॅन फॉलोइंग चांगली आहे, त्यामुळे हा चित्रपट ओपनिंग डेलाच चांगली कमाई करु शकतो. 7 कोटींहून अधिक कमाई किंवा 8,9 किंवा 10 कोटींच्या घरात कमाई करण्याची शक्यता आहे.  त्याचप्रमाणे बस्तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा  सुदिप्तो सेन  यांनी सांभाळली असून पहिल्याच दिवशी हा सिनेमा 3-4 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. 


बस्तर आणि योद्धाची शैतानसोबत टक्कर


अदा शर्माच्या बस्तरसोबत योद्धाची टक्कर होणार आहे. पण या दोन सिनेमांची सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या शैतानसोबत टक्कर होणार आहे. सध्या अजय देवगण आणि आर माधवनचा शैतान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे या दोन सिनेमांचं रेकॉर्ड कोण मोडून कारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Yodha : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची 'ओपनिंग डे'लाच बॉक्स ऑफिसवर होणार जादू, पहिल्याच दिवशी करणार एवढं कलेक्शन?