Bhumi Pednekar On OTT :  मागील काही वर्षात ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते-अभिनेत्रीदेखील ओटीटीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. कोरोना महासाथीनंतर हा ट्रेंड वाढला असल्याचे चित्र आहे. गेरराईंयामध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone), डार्लिंगमध्ये आलिया भट (Alia Bhatt), जाने जान मध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) आदी अभिनेत्रींनी ओटीटीला प्राधान्य दिले होते. भूमी पेडणेकरनेदेखील 'भक्षक'च्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ओटीटीला पंसती का आहे, याचे कारण भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सांगितले आहे. 


एका प्रश्नाला उत्तर देताना भूमी पेडणेकरने म्हटले की, माझ्यापुरतं बोलायचे झाल्यास मी नेहमीच चांगल्या प्रोजेक्टला प्राधान्य दिले आहे. मग तो चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार कि ओटीटी स्ट्रीमिंगवर होणार, याचा विचार केला नाही. मात्र, मागील काही वर्षात अनेक कलाकारांनी ओटीटी स्ट्रीमिंग प्रोजेक्टला प्राधान्य दिले असल्याचे चित्र आहे.ओटीटी, ऑनलाईन स्ट्रिमिंगमुळे तुम्ही जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचता अस भूमीने सांगितले.


भूमी पेडणेकरने पुढे म्हटले की, ऑनलाईन स्ट्रिमिंग, ओटीटीमुळे कलाकारांना प्रेक्षकांचा एक नवा वर्ग उपलब्ध झाला आहे. जगभरातील प्रेक्षकांपर्यंत तुमची कलाकृती पोहचते. त्यामुळेच भक्षक हा जागतिक चित्रपटांच्या यादीत आला. याचाच अर्थ तुमच्याकडे दमदार कंटेंट असेल तर तुमच्या कलाकृतीला जगभरातून दाद मिळू शकते असेही तिने सांगितले. 






'भक्षक' बाबत आलेला अनुभव सांगताना भूमी पेडणेकरने म्हटले की, भक्षक ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर  जगभरातील प्रेक्षकांनी मेसेज करून दाद दिली. खरंतर मला हा धक्काच होता, एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझा चित्रपट जगभरात अल्पावधीत पोहचला. असा अनुभव मला कधीच आला नव्हता. त्यामुळे इतर अभिनेत्री, कलाकारांचाही अनुभव माझ्या सारखाच असेल, त्यामुळे त्यांच्याकडूनही ओटीटीला प्राधान्य दिले जात असावे, असेही भूमी पेडणेकरने सांगितले.