Yodha Sidharth Malhotra Movie :  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), राशि खन्ना (Raashi Khan) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांची मुख्य भूमिका असलेला 'योद्धा' (Yodha) हा सिनेमा 15 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सध्या या सिनेमाच्या संपूर्ण टीम ही त्यांच्या प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे. ॲक्शन-पॅक्ड असलेल्या सिनेमाची सध्या प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून ओपनिंग डेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाचं चांगलं कलेक्शन होत असल्याचं समोर आलंय. 


योद्धा या चित्रपटात  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्ना यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटातील गाण्यांमुळेही या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण अद्याप या चित्रपटात दिशा पटानीची नेमकी काय भूमिका असणार याविषयी कोणताही खुलासा झालेला नाही. त्यामुळे तिच्या व्यक्तिरेबाबत प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


'ओपनिंग डे'ला योद्धाचं होऊ शकतं इतकं कलेक्शन


बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, ट्रेड अनॅलिस्ट गिरीश जोहर यांनी योद्धाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे प्रोडक्शन हाऊसकडून त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व काही करण्यात येईल. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला. तसेच  सिद्धार्थ आणि दिशाची फॅन फॉलोइंग चांगली आहे, त्यामुळे हा चित्रपट ओपनिंग डेलाच चांगली कमाई करु शकतो. 7 कोटींहून अधिक कमाई किंवा 8,9 किंवा 10 कोटींच्या घरात कमाई करण्याची शक्यता आहे. 


अदा शर्माच्या 'बस्तर'सोबत होणार योद्धाची टक्कर


अदा शर्माच्या बस्तरसोबत योद्धाची टक्कर होणार आहे. तसेच सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणाऱ्या शैतानसोबतही त्याचा सामना होणार आहे. सध्या अजय देवगण आणि आर माधवनचा शैतान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. शैतानने आतापर्यंत जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


ही बातमी वाचा : 


Soham Bandekar : बांदेकर भावोजी आणि सुचित्रा वहिनींना तुझ्या मालिकेत काम देणार का? लेकानं दिलं मिश्कील उत्तर, म्हणाला इच्छा आहे पण...