एक्स्प्लोर
Year ender 2017: नाव मोठं, लक्षण खोटं - टॉप 5 फ्लॉप सिनेमे
मोठे हिरो असूनही फ्लॉप ठरलेल्या 5 सिनेमांवर एक नजर
मुंबई: बॉलिवूडला नववर्षाची चाहूल लागली आहे. मागे वळून पाहताना म्हणजेच 2017 मध्ये बॉलिवूडने अनेक मोठे चित्रपट दिले. पण या वर्षात नाव मोठं, लक्षण खोटं असंच काहीसं या 5 सिनेमांबाबत घडलं आहे. मोठे हिरो असूनही फ्लॉप ठरलेल्या 5 सिनेमांवर एक नजर
1) दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा यंदाच्या फ्लॉप सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात किंग खान शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांची भूमिका आहे. या सिनेमावर 80 कोटी खर्च करण्यात आले होते, मात्र यातून केवळ 63 कोटीच वसूल झाले.
2) या यादीत कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाचाही नंबर लागतो. कपिलच्या या सिनेमाने 10 कोटींची कमाई केली, पण या सिनेमासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च आला होता.
3) या यादीत अजय देवगण आणि इम्रान हाशमी यांच्या ‘बादशाहो’चाही नंबर लागतो. या सिनेमाचं बजेट 80 कोटींचं होतं. या सिनेमाने कमाईचा आकडा 78.02 पर्यंत पोहोचवला.
4) संजय दत्तची भूमिका असलेला भूमी हा सिनेमाही यंदा फ्लॉप ठरला. या सिनेमाने केवळ 8.50 कोटी रुपयांचाच गल्ला जमवला.
5) मोठ्या विश्रांतीनंतर अभिनेता गोविंदाने ‘आ गया हिरो’ सिनेमातून कमबॅक केलं. मात्र प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात गोविंदाला अपयश आलं. या सिनेमाने केवळ 1.30 कोटी रुपयांचीच कमाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement