एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तेजस्विनी पंडितची अमिताभ बच्चन यांना खास भेट
पण 'ये रे ये रे पैसा'च्या बबलीकडे म्हणजेच तेजस्विनी पंडितकडे बिग बी यांच्यासाठी एक खास गोष्ट दाखवण्यासारखी होती.
मुंबई : आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा'च्या टीमने महानायक अमिताभ बच्चन ह्यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटाच्या कलाकारांनी बिग बींसोबत गप्पा मारल्या. पण 'ये रे ये रे पैसा'च्या बबलीकडे म्हणजेच तेजस्विनी पंडितकडे बिग बी यांच्यासाठी एक खास गोष्ट दाखवण्यासारखी होती.
तेजस्विनी पंडितने आपल्या आईचा एक व्हिडीओ बिग बींना दाखवला. हा व्हिडीओ अतिशय खास होता. कारण या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या आईंसोबत म्हणजे ज्योती चांदेकरांसोबत खुद्द अमिताभ बच्चन होते. 1972 साली प्रदर्शित झालेल्या बी आर इशारा दिग्दर्शित 'एक नजर' ह्या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका केली होती. त्यावेळी त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या.
तेजस्विनी पंडितने बिग बी यांच्यासोबतच्या या भेटीत त्यांना 'एक नजर' या चित्रपटातली एक व्हिडीओ क्लिप दाखवली, ज्यात ज्योती चांदेकर आणि अमिताभ बच्चन यांचे संभाषण असलेले दृश्य आहे. ही व्हिडीओ क्लिप स्वतः ज्योती चांदेकर यांनी आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे.
स्वतःच्या आईचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांना दाखवणं आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं, हे सगळी इव्हेंट वर्णन करण्यासारखी आहे. त्याबाबत तेजस्विनी सांगते, ''मी हे फार आधी प्लॅन केलं होतं की जेव्हा मी अमिताभजींना भेटेन, तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ नक्की दाखवणार. माझ्या आईची पण खूप इच्छा होती. पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी नर्व्हस होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडीओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहित नव्हतं. म्हणून मी तिथे पोचल्यावर 'ये रे ये रे पैसा' बाबतची चर्चा करुन झाल्यावर त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांना हा व्हिडीओ दाखवला. माझ्या आईसोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. पण हा एक सुंदर नॉस्टॅल्जिया दिल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटलं . He was quiet happy."
तेजस्विनी पुढे म्हणाली, "मी त्यांना हे देखील सांगितलं की माझे बाबा तुमचे फार मोठे फॅन होते. जेव्हा 'कुली' चित्रपटाच्या शूटिंग वेळेस तुमचा मोठा अपघात झालेला, तेव्हा माझ्या बाबांनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलेलं. तुम्ही बरे झालात तसे बाबा चालत सिद्धिविनायकाला गेले आणि सोन्याच्या दुर्वा गणपतीला अर्पण केल्या होत्या. आमची तेव्हा सोन्याच्या दुर्वा घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण बाबा तुमचे खरंच फार मोठे फॅन होते. त्यांना हे ऐकून फार कौतुक आणि समाधान वाटलं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement