Jhund : 'झुंड' काढण्यासारखं थोडं काही,वेचण्यासारखं खूप काही, लेखक क्षितिज पटवर्धनांनी सकारात्मक बाजू आणली प्रेक्षकांसमोर
Kshitij Patwardhan : लेखक क्षितिज पटवर्धन यांची झुंड' सिनेमा संदर्भातील सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Kshitij Patwardhan On Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड' (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता लेखक क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांची 'झुंड' सिनेमा संदर्भातील सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'झुंड' काढण्यासारखं थोडं काही,वेचण्यासारखं खूप काही असे म्हणत क्षितिज पटवर्धन यांनी 'झुंड' सिनेमाची सकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे, "खेळाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट, बदलाची आहे, शक्यतेची आहे, स्वप्नाची आहे. ती जेवढी सिनेमॅटिक आहे, तितकीच खरी खुरी आहे. ती दोन पातळ्यांवर पळणारी आहे. एक कथा खेळातून पुढे सरकते आणि दुसरी सामाजिकतेतून, वाक्यातून, दृश्यातून, पार्श्वसंगीतातून, कृतीतून हा सामाजिक पदर सिनेमा कधीच सोडत नाही, आणि तिथेच तो वेगळा ठरतो".
View this post on Instagram
'झुंड' सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतो आहे.
संबंधित बातम्या
Swapnil Bandodkar : गायक स्वप्नील बांदोडकरचं 'सांग प्रिये' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
The Kashmir Files : पहिल्याच दिवशी 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जादू, सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना अश्रू अनावर
Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha