(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगातला सर्वात श्रीमंत चाईल्ड अॅक्टर, ज्याच्यापुढे शाहरुख, सलमानही फेल; वयाच्या 13 व्या वर्षी मिलियन डॉलर्सची संपत्ती
World Richest Child Actor: जगातील सर्वात श्रीमंत बालकलाकारानं वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 50 कोटींची संपत्ती कमावलीय. त्यानं वयाच्या 6 व्या वर्षी स्वतःचा शो सुरू केला आणि तो रातोरात स्टार झाला. आज तो बॉलिवूडच्या बड्या अॅक्टर्सपेक्षा जास्त श्रीमंत आहे.
World Richest Child Actor: सर्वात महागड्या चित्रपटांपासून ते सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांबाबत आपण सर्वचजण अनेकदा चर्चा करत असतो. पण, तुम्ही कधी सर्वाधिक कमाई करणारा चाईल्ड अॅक्टर (Richest Child Actor) कोण? याचा विचार केलाय का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका चाइल्ड आर्टिस्टबाबत (Child Artist) सांगणार आहोत. ज्याच्याकडे बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक ए-लिस्टर्सपेक्षा अधिक संपत्ती आहे. शाहरुख (Shah Rukh Khan) आणि सलमानची (Salman Khan) एकूण संपत्ती जरी काढली, तर या चाइल्ड अॅक्टरच्या संपत्तीपुढे चारआणेच ठरतील. हे फक्त 13 वर्षांचं पोर जगातील सर्वात मोठ्या शोचा स्टारही आहे. एवढंच काय तर, वयाच्या 16व्या वर्षी तो 50 कोटी रुपयांचा मालकही आहे. कोण आहे तो? ओळखता का या चाइल्ड आर्टिस्टला?
जगातील सर्वात श्रीमंत चाईल्ड आर्टिस्ट बॉलिवूडचा तर अजिबात नाही... हा हॉलिवूडचा चाइल्ड स्टार आहे. ज्यानं अनेक चांगल्या अभिनेत्यांना संपत्तीच्या बाबतीत पराभूत केलं आहे. इयान आर्मिटेज असं त्याचं नाव आहे, ज्याला तुम्ही सिटकॉम 'यंग शेल्डन'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहिलं आहे. तो 2024 सालचा सर्वात श्रीमंत बालकलाकार आहे. celebritynetworth.com नं दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय इयानची एकूण संपत्ती 6 डॉलर दशलक्ष म्हणजेच, 50 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
लहान वयात सुरू केला स्वतःचा शो
जॉर्जियामध्ये जन्मलेल्या इयान आर्मिटेजनं त्याच्या यूट्यूब व्हिडीओ सीरिज 'इयान लव्ह्स थिएटर'द्वारे लोकप्रियता मिळवली. ही मालिका 2014 मध्ये आली आणि ती व्हायरल झाली. यानंतर, तो 'द पेरेझ हिल्टन शो' मध्ये दिसला आणि 2017 मध्ये त्यानं अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि 'द ग्लास कॅसल', 'अवर सोल्स ॲट नाईट' आणि 'आय एम नॉट हिअर' या तीन चित्रपटांमध्ये दिसला. याशिवाय तो 'लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट' आणि 'बिग लिटल लाईज' या टीव्ही शोमध्येही दिसला होता.
वयाच्या 16 व्या वर्षी कोट्यधीश
इयानला 'द बिग बँग थ्योरी' च्या स्पिनऑफ 'यंग शेल्डन'मध्ये मुख भूमिकेसाठी साइन केलं होतं. फक्त नऊ वर्षाचा इयान प्राईमटाईम टेलिव्हिजन शो लीड करणारा सर्वात कमी वयाच्या व्यक्तींपैकी एक बनला आहे. त्यानं तब्बल सात वर्ष हे पात्र साकारलं. त्यांनी 'यंग शेल्डन'च्या प्रत्येक एपिसोडसाठी 30,000 डॉलर सॅलरी चार्ज केले होते. पहिल्या सीझनमध्ये त्यानं 660,000 डॉलर म्हणजेच, 4.6 कोटी रुपये कमावले होते. तसेच, पाचव्या सीझनपर्यंत तो 1.1 मिलियन डॉलर म्हणजेच, 8 कोटी रुपये कमावत होता. वयाच्या 13व्या वर्षी तो जगातील सर्वात कमी वयाचा कोट्यधीशांपैकी एक बनला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :