एक्स्प्लोर
युवराजचं जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज सिक्सर किंग नुकताच अभिनेत्री हेजल किचसोबत विवाहबंधनात अडकला आहे. यानंतर युवीसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. त्याच्यावर बायोपिक येणार असल्याची सध्या चर्चा आहे. 'पिंकविला'ने एका मोठा दैनिकाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. युवराजचं क्रिकेट करिअर, लव्ह स्टोरी आणि एकूणच जीवन प्रेक्षकांना आवडण्यासारखं असल्यामुळे निर्माते सिनेमा काढणार असल्याचं बोललं जात आहे. युवी आणि निर्मात्यांमध्ये याबाबत चर्चा झाली असल्याचंही बोललं जातंय. मात्र सध्या युवराजच्या लग्नामुळे हा विषय बाजूला ठेवण्यात आला आहे. मात्र लवकरच याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























