एक्स्प्लोर
'केबीसी'मध्ये यावर्षी बिग बींऐवजी रणबीरची वर्णी?

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' हा टीव्ही शो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. मात्र यावर्षी ते हा शो होस्ट करणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी अभिनेता रणबीर कपूरची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. अमिताभ बच्चन यांनी केबीसीचे आतापर्यंत सात सीझन होस्ट केले आहेत. केवळ एक सीझन अभिनेता शाहरुख खानने होस्ट केला होता. मात्र त्यावर्षी हा शो फ्लॉप झाला. त्यानंतर पुन्हा बिग बींना बोलवण्यात आलं. रणबीर या शोमध्ये आला तर त्याची ही छोट्या पडद्यावरील पहिलीच एंट्री असेल. त्याचा जग्गा जासूस हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. शिवाय अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकच्या शुटिंगलाही त्याने सुरुवात केली आहे. मात्र रणबीर केबीसी होस्ट करणार, अशी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे बिग बींची जागा कोण घेणार, याची उत्सुकता लागली आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















