News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

'अमर'ला 'अकबर'ची श्रद्धांजली, ऋषी कपूरनी प्रोफाईल फोटो बदलला!

FOLLOW US: 
Share:
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं. 'दयावान' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विनोद खन्ना यांना सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विनोद खन्ना यांच्यासोबत 'अमर,अकबर,अँथोनी' या सिनेमात अकबरची भूमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. अमर, आम्ही तुला विसरणार नाही, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं. इतकंच नाही तर त्यांनी आपला ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरही बदलला. https://twitter.com/chintskap/status/857487443913719808 दुसऱ्या एका ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी एक फोटो शेअर करुन, "तुमच्यासोबतच्या घालवलेल्या यादगार क्षणांच्या आठवणी ताज्या होत आहेत. माझा मित्र बनल्याबद्दल धन्यवाद" असं म्हटलं आहे. https://twitter.com/chintskap/status/857497396569190400 ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनी 'अमर,अकबर,अँथोनी' (1977), चांदणी (1989), 'इना मीना डिका' (1994) आणि 'टेल मी ओ खुदा (2011)' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. https://twitter.com/chintskap/status/857526481869692931 https://twitter.com/chintskap/status/857527840769589248 विनोद खन्ना यांचं निधन बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते. बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली. राजकारणातही सक्रीय विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते. संबंधित बातम्या ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? 'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द
Published at : 27 Apr 2017 03:11 PM (IST) Tags: Akbar vinod khanna Rishi Kapoor

आणखी महत्वाच्या बातम्या

Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...

Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...

Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले

Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले

Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे

Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे

Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...

Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात

टॉप न्यूज़

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान

Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान

Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल