एक्स्प्लोर

बॉलिवूडचा सुपरफ्लॉप हिरो, कधीकाळी बायकॉटही झाला, पण तरीही आज 1200 कोटींचा मालक; कमाईचा सोर्स ऐकाल तर, हैराण व्हाल!

Bollywood Biggest Flop Actor: बॉलिवूडचा सुपरफ्लॉप म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नुकताच रोल्स रॉयस कलिनन कार खरेदी केल्यामुळे चर्चेत आला होता. याचं कारण ही जगातील सर्वात महागडी कार आहे.

Whos Bollywood Biggest Flop Hero? अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या 'पुष्पा 2: द रुल'मुळे (Pushpa 2: The Rule) चर्चेत आहे. चाहतेही त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. प्रभासनं (Prabhas) 'सालार'मधून पुनरागमन केलं आणि 'कल्की 2898 एडी' सारखा ब्लॉकबस्टर दिला. रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) 'अॅनिमल'दिला आणि तो पूर्वीपेक्षा मोठा स्टार झाला. त्याची फी आणि नेट वर्थही वाढला. पण एक असा अभिनेता आहे ज्याची संपत्ती या तीन सुपरस्टार्सपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा बॉलिवूडमध्ये सुपरफ्लॉप ठरलाय.

बॉलिवूडचा सुपरफ्लॉप म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नुकताच रोल्स रॉयस कलिनन कार खरेदी केल्यामुळे चर्चेत आला होता. याचं कारण ही जगातील सर्वात महागडी कार आहे. भारतात या गाडीची किंमत तब्बल 12 कोटी रुपये आहे. बॉलिवूडच्या जगतात या अभिनेत्याला सुपरफ्लॉपचा टॅग मिळाला. कधीकाळी त्याला बायतॉटही करण्यात आलेलं. त्यानंतर त्याच्यात आणि बॉलिवूडमध्ये अंतर वाढलं, पण तरीसुद्धा या अभिनेत्यानं 20 वर्षांत आपलं भलमोठं साम्राज्य उभं केलं. आज या सुपरफ्लॉपचा टॅग घेऊन मिरवणाऱ्या अभिनेत्याची मालमत्ता आजच्या बॉलिवूडच्या आघाडीच्या स्टारकास्टपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. 

आतापर्यंत तुम्ही या अभिनेत्याला ओळखलंच असेल आणि ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला त्याचं नाव सांगतो. हा अभिनेता म्हणजे, विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi). याच्याकडे आज तब्बल 1200 कोटींची संपत्ती आहे. याची बॉलिवूडमधली कारकीर्द अद्याप रुळावर आलेली नाही. पण, वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यानं एवढे पैसे कमावलेत की, आजचे आघाडीचे कलाकार संपत्तीच्या बाबतीत त्याच्या आसपासही नाहीत. याच्याकडे इतके पैसे आहेत की, आज एका चित्रपटासाठी 100 कोटींपेक्षा जास्त मानधन घेणारे कलाकारही त्याच्यासमोर पानी कम चाय आहेत. हा अभिनेता स्वतः एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटींचं मानधन घेतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेकचा डेब्यू चित्रपट कोणता?

विवेक ओबेरॉयनं 2002 मध्ये 'कंपनी' चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला. 'साथिया', 'मस्ती' आणि 'ओमकारा' यांसारखे हिट चित्रपट दिल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, हा पठ्ठ्या आता बॉलिवूडवर राज्य करणार. पण, नियतीलाच मान्य नव्हतं. त्याच्या पर्सनल लाईफची सावली प्रोफेशनल लाईफवर पडलीच. 

ऐश्वर्यासोबतच्या नात्यामुळे त्याचं आणि सलमान खानमध्ये मोठा वाद झाला. वेळेसोबत विवेकच्या फिल्म्स बॉक्स ऑफिसवर एका पाठोपाठ एक आदळू लागल्या. त्यावेळी अशा अफवा होत्या की, सलमानच्या विरोधात गेल्यामुळे त्याला इंडस्ट्रीमधून बायकॉट करण्यात आलं होतं. 

पण विवेक ओबेरॉयनं आपलं काम सोडलं नाही. एकापाठोपाठ एक चित्रपट आले आणि जोरदार आपटले, तरी विवेकनं काम सुरूच ठेवलं. 'रक्त चरित्र' आणि'लूसिफ़र' यांसारखे तेलुगु आणि मल्याळम फिल्म्ससोबत 'इनसाइड एज'सारख्या वेब सीरिजमध्येही काम केलं. 

विवेकच्या कमाईचा स्त्रोत काय? 

द स्टेट्समनसह अनेक मीडिया रिपोर्ट्सनं त्यांची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. विवेकची मालमत्ता रणबीर कपूर (350 कोटी), अल्लू अर्जुन (340 कोटी), प्रभास (250 कोटी) आणि रजनीकांत (400 कोटी) या सुपरस्टार्सपेक्षा जास्त आहे. 

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, आपल्या फिल्मी करिअरची परिस्थिती लक्षात घेऊन विवेक ओबेरॉयनं व्यवसायात गुंतवणूक केली. त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर (रिअल इस्टेट) आणि मेगा एंटरटेनमेंट (इव्हेंट मॅनेजमेंट) कंपनी या दोन सोर्सेसकडून आला आहे. 

विवेक अल मरजान आइलँड, रास अल खैमाह 2,300 कोटी रुपयांच्या Aqua Arch प्रोजेक्टचा फाउंडर आणि स्वर्णिम विश्वविद्यालयाचा को-फाउंडर आहे. याशिवाय अनेक स्टार्टअप्समध्ये ते एजंल इव्हेस्टर्स आहेत. या सर्व प्रोजेक्ट्सनी मिळून विवेकला बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता बनवलं आहे. विवेकनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं की, "अभिनय हा माझा छंद आहे आणि व्यवसाय मला ते पूर्ण करण्यास मदत करतो. मला न आवडणारं कोणतंही काम करण्याची, कोणत्याही लॉबीसमोर झुकण्याची किंवा असं काहीही करण्याची सक्ती नाही. मला ते स्वातंत्र्य दिलंय." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget