Rishi Kapoor : रिद्धिमामुळे ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती? नीतू कपूर यांनी केला मोठा खुलासा
Rishi Kapoor : नीतू कपूर यांनी नुकतच ऋषी कपूर यांच्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे.
Rishi Kapoor : ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Nitu Kapoor) यांची मुलगी रिद्धिमा कपूर (Ridhima Kapoor) साहनी हिने नुकतच सिनेक्षेत्रात पदार्पण केलं आहे. नेटफ्लिक्सच्या फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हजमधून रिद्धिमा स्क्रिनवर झळकली. अभिनयाचं बाळकडून असलेल्या कुटुंबात लहानाची मोठी झाली तरीही रिद्धिमाने कधीही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं नव्हतं.राज कपूर यांची, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी तरीही रिद्धिमाने हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना कायमच पडायचा. याचच उत्तर आता नीतू कपूर यांनी दिलं आहे.
दरम्यान रिद्धिमाने स्वत:हून हा निर्णय घेतला असल्याचं नीतू कपूर यांनी नुकतच सांगितलं. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात 'खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड' मध्ये रिद्धिमाच्या या निर्णयाविषयी भाष्य केलं आहे. कपूर कुटुंबातील स्त्रिया या कायमच सिनेक्षेत्रापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. नीतू कपूर यांनीही लग्नानंतर सिनेक्षेत्रात फारसं काम केलं नाही. करिना आणि करिश्मा या कपूरांच्या लेकींनी मात्र त्यांची एक ओळख निर्माण केली. पण रिद्धिमाने हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना कायमच पडतो?
नीतू कपूर यांनी काय म्हटलं?
नीतू कपूर यांनी म्हटलं की, रिद्धिमाला हे माहिती होतं की, जर ती अभिनेत्री झाली तर तिचे वडील कदाचित आत्महत्याही करतील. रिद्धिमामध्ये अभिनेत्री होण्याचं कौशल्य होतं, पण तिच्या वडिलांनी तिच्या या स्वप्नाचा कधीच स्वीकार केला नसता. म्हणून ती नेहमीच या क्षेत्रापासून दूर राहिली. तिला दुसऱ्यांची नक्कलही उत्तम करता येते. पण लहानपणीच तिने अभिनेत्री व्हायचं नाही, असं ठरवलं... कारण तिचे वडील नाराज होती याची कल्पना तिला होती.
पुढे नीतू कपूर यांनी म्हटलं की, ऋषी कपूर यांनी कधीच अभिनेत्रींबद्दल वाईट विचार केला नाही किंवा मुलींनी चित्रपटात काम करू नये असंही त्यांना कधी वाटायचं नाही. पण आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या बाबतीत खूपच काळजी करणारा होता. रिद्धिमाने तिच्या वडिलांची ही चांगली बाजू समजून घेतली. त्याच्यासाठी तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्नही केला नाही. ती आनंदाने म्हणाली की, मला फॅशन डिसाईनिंग करायचं आहे... तेव्हा ऋषी यांनी तिला आनंदाने लंडनला शिकायला पाठवलं...