एक्स्प्लोर

मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या लग्नाची तारीख ठरली?

अर्जुन-मलायकाच्या लग्नाला तिच्या मैत्रिणी-अभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि त्यांची वांद्र्यात राहणाऱ्या मैत्रिणींची गँग उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत. रणवीर-दीपिकालाही लग्नाचं निमंत्रण असल्याची माहिती आहे.

मुंबई : बॉलिवूडचं एक हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं वृत्त आहे. नाही, नाही आम्ही आलिया-रणबीरच्या लग्नाविषयी बोलत नाही. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची तारीख ठरल्याचं म्हटलं जात आहे. पुढच्याच महिन्यात मलायका-अर्जुन विवाहबंधनात अडकणार आहेत. 19 एप्रिलच्या मुहूर्तावर मलायका-अर्जुन लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ख्रिश्चन पद्धतीने मलायका-अर्जुन विवाहाच्या आणाभाका घेणार असल्याचं म्हटलं जातं. मलायका-अर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. दोघं हातात हात घालून एकमेकांसोबत फिरताना अनेक वेळा दिसल्यामुळे अर्जुन-मलायका डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कॉफी विथ करणमध्ये करण जोहरने दोघांनाही वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्यांच्या कथित अफेअरविषयी छेडलं होतं. मलायकाने लाजून प्रतिक्रिया दिली होती, तर अर्जुनला तू सिंगल आहेस का? हा प्रश्न विचारल्यावर त्याने नकारार्थी मान डोलावली होती. त्यामुळे चाणाक्ष प्रेक्षकांनी वेळीच ताडलं. मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये तब्बल बारा वर्षांचं अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे. ती 45 वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या 33 वर्षांचा आहे. त्यामुळे दोघांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. दरम्यान, लग्नाला मलायकाच्या मैत्रिणी-अभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि त्यांची वांद्र्यात राहणाऱ्या मैत्रिणींची गँग उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत. रणवीर-दीपिकालाही लग्नाचं निमंत्रण असल्याची माहिती आहे. 'स्पॉटबॉय' या मनोरंजन वेब पोर्टलने याविषयी बातमी दिली आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं. यापूर्वी विराट-अनुष्का, प्रिती झिंटा, उर्मिला मातोंडकर, नेहा धुपिया यांनीही लपूनछपून लगीनगाठ बांधली होती. लग्न झाल्यानंतरच त्यांचे फोटो थेट सोशल मीडियावर आले. त्यामुळे मलायका-अर्जुनही त्यांचाच कित्ता गिरवण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget