Pallavi Joshi: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानंतर आता त्यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार, द वॅक्सीन वॉरच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे.
हैदराबादमध्ये द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान एका गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती जाऊन पल्लवी जोशी यांना धडकली. मात्र, दुखापत होऊनही पल्लवी जोशीने चित्रपटाचा तो शॉट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. रिपोर्टनुसार, आता पल्लवी जोशी तब्येत ठीक आहे. शूटिंगदरम्यानचा एक फोटो देखील पल्लवी जोशी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
'द वॅक्सीन वॉर' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिलं, 'सादर करत आहोत- ‘द वॅक्सीन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.' 15 ऑगस्ट 2023 रोजी द वॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pallavi Joshi: 'हा लोकांचा चित्रपट...'; 'द कश्मीर फाइल्स'च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट