Waltair Veerayya Box Office Collection Day 3:  साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकता. वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून चिरंजीवी हे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. 13 जानेवारी रोजी चिरंजीवी यांचा 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच दोन दिवसांमध्ये 50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट लवकरच 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं तीन दिवसांचे कलेक्शन...


चिरंजीवी यांच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कलेक्शन केलं. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 29.6 कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 20 कोटींची कमाई केली. चिरंजीवी यांच्यासोबत श्रुती हसनने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


शुक्रवारचे कलेक्शन-29.6 कोटी
शनिवार कलेक्शन-19.8 कोटी 
रविवारचे कलेक्शन- 20 कोटी
तीन दिवसांचे एकूण कलेक्शन-69.40 कोटी


वॉलटेर वीरय्या हा चित्रपट ऑनलाइन लीक देखील झाला आहे. पण त्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर कोणताही परिणाम न झाल्याचं दिसत आहे.  या चित्रपटातील चिरंजीवी यांच्या अॅक्शन, स्टाईल आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटात रवी तेजा, प्रकाश राज, श्रुती हासन आणि कॅथरीन ट्रसा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 


चिरंजीवी यांनी काही दिवसांपूर्वी वॉलटेर वीरय्या या चित्रपटातील गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला होता. या गाण्याचं शूटिंग फ्रान्स येथे झालं आहे. या मेकिंग व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


IFFI 2022 : भारतीय चित्रपटसृष्टीतील Personality Of The Year चिरंजीवी यांना जाहीर!