Chinmay Mandlekar: आपल्या कसदार  लिखाणाने  आणि संयत अभिनयामुळे ओळखला  जाणारा अभिनेता  चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'आलंय  माझ्या राशीला' (Aalay Mazya Rashila) असं  म्हणतोय. तो असं  का म्हणतोय? त्याच्या  राशीला  नेमके  कोण आलंय? हा  प्रश्न  तुम्हाला ही पडला असेलच. या  प्रश्नाचे उत्तर  तुम्हाला 10  फेब्रुवारीला  प्रदर्शित होणाऱ्या आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित 'आलंय  माझ्या राशीला' या  मराठी चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.


प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्टये, सौंदर्य आहेत. या वैशिष्टय़ांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.  


अभिनेते चिन्मय मांडलेकर सोबत अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड यांच्या या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. युवा अभिनेता प्रणव पिंपळकर  या चित्रपटातून आपलं  मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येईल.  


पाहा टीझर 



‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे. वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे तर नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी तर व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे. फिल्मास्त्र स्टुडिओने ‘आलंय माझ्या राशीला’  चित्रपटाच्या  वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या


Entertainment News Live Updates 16 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!