Pallavi Joshi: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सध्या चर्चेक आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब आबे. तसेच हा सिनेमात प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे". त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर आता पल्लवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


पल्लवी यांनी शेअर केली पोस्ट


'काश्मिरी पंडित यांच्या दु:खावर अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदाय मौन बाळगून होता. 3 दशकांनंतर, भारतीय चित्रपटसृष्टीला शेवटी कळले की भारताची कथा सत्य आणि वस्तुनिष्ठपणे सांगण्याची गरज आहे.' असं पल्लवी यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 


पल्लवी यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलं, 'रुपेरी पडद्यावर कटू सत्य बघायला लोकांना आवडणार नाही, याची विवेक आणि मला नेहमीच जाणीव होती, पण काश्मीरची जुने, खोटी कथा सांगून राजकीय अजेंडासाठी व्यासपीठाचा वापर अनेकांकडून करण्या आला हे खूप दुर्दैवी आहे. नरसंहार नाकारणाऱ्याच्या विधानांविरुद्ध भारतातील लोक ज्या प्रकारे ‘द काश्मीर फाइल्स’ ला सपोर्ट करत होते ते पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. मी ‘द काश्मीर फाइल्स’ हा लोकांचा चित्रपट आहे. मला इस्रायलचे राजदूत H.E Naor गिलॉन आणि कॉन्सुल जनरल श्री कोब्बी शोशानी यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानते आहेत.'






पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली आहे. ज्या काश्मिर येथील विद्यार्थ्यांना स्वतंत्र काश्मिर होण्यासाठी लढायला प्रेरित करतात.


वाचा इतर महत्वाच्या बातमी: 


Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाले, आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'