Vivek Agnihotri: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. विविके यांचा 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामुळे देखील विविके हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता पाच वर्षांपूर्वीच्या ट्वीट प्रकरणाबाबत नुकतीच विवेक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
पाच वर्षांपूर्वीच्या ट्वीट प्रकरणाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'दिल्ली उच्च न्यायालयातील सू मोटो क्रिमिनल अटेम्प्ट केसच्या कालच्या घडामोडींवर माझे स्टेटमेंट, काही पक्षपाती प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात ज्या प्रकारे बातमी दिली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. ' या ट्वीटमध्ये त्यांनी दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या प्रकरणाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे.
विवेक अग्निहोत्रींनी ट्वीटवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'पाच वर्षांपूर्वी अमेरिकास्थित 'Drishtikone'ने गौतम नवलखा यांच्यावर एक लेख प्रकाशित केला होता, ज्यांना भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती. स्रोत आणि लेखकाचा हवाला देऊन मी फक्त ट्वीट थ्रेड म्हणून लेख पोस्ट केला.त्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने Drishtikone, श्री एस. गुरुमूर्ती आणि माझ्यावर काही आरोप केले. तो लेख ज्याने लिहिला होता, त्या लेखकाने ताबडतोब माफी मागून तो लेख काढून टाकला, त्यानंतर श्री एस गुरुमूर्ती यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.यामुळे माझ्याकडे कोणतीही पर्याय राहिली नाही. लेखाच्या स्त्रोतांनीच माफी मागितल्यामुळे मी नैतिक आणि बौद्धिकदृष्ट्या माफी मागितली. '
विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल देखील माहिती दिली आहे. त्यांचा वॉक्सिन वॉर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: