Vivek Agnihotri: 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (Saeed Akhtar Mirza) यांनी 'द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कचरा आहे.' असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता सईद अख्तर मिर्झा यांच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, "मैंने कहा मिर्जा साहब को सलाम, द दिल्ली फाईल्सनंतर पुन्हा भेटूयात. 2024.' विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आता 2024 मध्ये द दिल्ली फाईल्स हा चित्रपट रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे.
'द वॅक्सीन वॉर' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.'
कोण आहेत सईद अख्तर मिर्जा?
1980 मध्ये रिलीज झालेल्या 'अल्बर्ट पिटों को गुस्सा क्यों आता है' तसेच 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहन जोशी हाजीर हो या चित्रपटांमुळे सईद अख्तर मिर्जा यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी कर्मा कॅफे नावाची शॉर्ट फिल्म लिहिली जी 2018 मध्ये प्रदर्शित झाली. तसेच त्यांनी 1987 मधील नुक्कड आणि 1988 मधील इंतझार या मालिकेंचे दिग्दर्शन केले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
The Kashmir Files: 'द कश्मीर फाईल्स कचरा आहे'; प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत